नगर ( विजय मते) - सध्या नागरिकांना प्रत्येक कामासाठी आधार कार्ड हे आवश्यक झाले आहे. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या विविध योजना नागरिकांसाठी असतात, पण त्याबाबत काही माहिती नसल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या योजना सर्वसमाजापर्यंत पोहचवणे हे आमचे कर्तव्य समजून बुर्हाणनगर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गजराजनगर व तपोवन भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी बाल आधार कार्ड व ई-श्रम कार्ड सुविधेचा शुभारंभ करुन त्याचा लाभ सर्वांना मिळेपर्यंत उपक्रम सुरु ठेवणार, असे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.
अक्षय कर्डिले युवा प्रतिष्ठान व अहमदनगर पोस्टल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅम्पचे गजराजनगर व तपोवन येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सूर्यपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू सूर्यवंशी, ग्रा.पं.सदस्य विशाल सूर्यवंशी, सागर मेट्टू, प्रदीप परदेशी, अजय डुकरे, राकेश शिनगारे, दत्ता पोतकुले, अभिषेक पाखरे, अक्षय सकट, शाम लोंढे, भैय्या कांबळे, जावेद पठाण, महेश कर्डिले, निलेश भगत, प्रताप गायकवाड, डॉ.दिपक दरंदले, गोपी काकडे, प्रताप बटूळे, राजू कर्डिले, अस्लम शेख आदि उपस्थित होते.
यावेळी अक्षय कर्डिले यांनी पोस्टल विभागाच्या इतर योजनांबाबत माहिती दिली. 1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना आधार कार्ड तर 16 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना ई-श्रम कार्ड नोंदणीमुळे या सुविधेचा लाभ होईल. सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी पोस्टल विभागाचे वसंत जाधव, तानाजी शिंदे, दिपक शेंगाळ, किशोर भुजबळ, सचिन माताडे, गीतांजली महाले आदिंनी परिश्रम घेतले तर अंगणवाडी सेविका अनिता मते, सरला कर्डिले, आशासेविका आशा पालवे, मदतनिस नलिनी बारगळे, बेबी वारुळे आदिंनी सहकार्य केले.
यावेळी सुर्यपुत्र प्रतिष्ठानच्यावतीने अक्षय कर्डिले यांचा या उपक्रमाबद्दल बबलू सूर्यवंशी यांनी कौतुक करुन त्यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार केला.
Post a Comment