भाजपाच्यावतीने महावितरण अधिक्षक अभियंतांना निवेदन

 


भाजपाच्यावतीने अधिक्षक अभियंतांना निवेदन

महावितरण कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्या वादात सर्वसामान्यांना वेठीस धरु नये - भैय्या गंधे


     नगर - गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरातील अनेक भागत बंद असलेल्या वीज पुरवठ्याबाबत भाजपाच्यावतीने वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन देऊन चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, सरचिटणीस  तुषार पोटे, उपाध्यक्ष संतोष गांधी, मंडल अध्यक्ष अजय चितळे, महावीर कांकरिया, अमोल निस्ताने, अशोक भोसले, लक्ष्मीकांत तिवारी, सुनिल सकट, पोपट भोसले, सुमित बटुळे, व्यंकटेश बोमादंडी, ज्ञानेश्वर धिरडे, ऋग्वेद गंधे आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर असल्याने शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचार्‍यांअभावी तो बंदच राहिला, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सध्या अनेक  विद्यार्थ्यांच्या परिक्षा चालू आहेत, अनेक हॉस्पिटलमध्ये पेशंट आहेत, अनेकांना ऑक्सिजन, यंत्रणा लावलेली आहे, त्याचबरोबरच वृद्धांनाही लाईट अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.


     पुढे बोलतांना भैय्या गंधे म्हणाले, महावितरण कर्मचार्‍यांच्याही अनेक अडचणी आहेत आणि आम्हालाही त्याची जाणिव आहे, आपल्या अडचणींमध्ये आम्ही पूर्णपणे आपल्या बरोबर आहोत व आपल्याही अडचणी दूर झाल्या पाहिजेत, हीच आमची पण भावना आहे. परंतु महावितरण कर्मचारी आणि राज्य सरकार या वादामध्ये सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरु नये. तातडीने शहरातील सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली.


     याप्रसंगी अधिक्षक अभियंता यांनीही शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकूण घेत सध्या कर्मचारी संपावर असल्याने अनेक वीज पुरवठ्याबाबत अडचणी झाल्या आहेत, परंतु उपलब्ध कर्मचार्‍यांच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post