अल्पबचत अभिकर्ते यांचा गौरव करत साजरा केला महिला दिन केडगाव पोस्टऑफिसचा उपक्रम


अहमदनगर:  पोस्टऑफिसच्या विविध योजनेत आपले अनमोल योगदान असणाऱ्या महिला प्रधान अभिकर्ते यांचा आज महिला दिनाच्या औचित्य साधत विशेष गौरव करण्यात आला.
समाजामध्ये घरोघरी संपर्क करत,अल्पबचतीचे महत्त्व सांगत, पोस्टऑफिसच्या योजनेची माहिती ग्राहकांना सांगत आपली बचत पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करणेकरिता ग्राहकांना प्रोत्साहित करणेकरिता महिला प्रधान अभिकर्ते यांचे मोठे योगदान आहे .केडगाव पोस्टऑफिस अंतर्गत जवळपास पन्नास पेक्षा अधिक महिला प्रधान अभिकर्ते कार्यरत असून त्याच्या अनमोल योगदानमुळेच केडगाव पोस्टऑफिस विविध योजनेत  सातत्याने उल्लेखनिय कामकाज करत  असते.
त्यामुळेच आज या विशेष दिनाचे औचित्यसाधत आज त्याचा विशेष गौरव प्रभारी पोस्टमास्टर सौ शुभांगी मांडगे, सौ सविता ताकपेरे यांचे हस्ते श्रीमती लता कोरे,पंकजा धर्म, रंजना वाघ,निता चौधरी,कुसुम रोहकले,गुलाब कटारिया,संगीता शर्मा,रेवती शेटे,श्रीमती  रेखा पावसे,श्रीमती अस्मिता कुलकर्णी गौरव करण्यात आला 





0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post