सौ. योगिता माळी यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर



इस्लामपूर  (प्रतिनिधी)शहरातील प्रसिद्ध उद्योजिका व  मे. व्यास इटरप्रायजेस च्या संस्थापक, व्यवस्थापक मा. सौ. योगिता अनिल माळी यांच्या  वस्त्रोद्योग क्षेत्रातील व्यास गारमेंट या आदर्श उद्योगाची सांगली जिल्हा उद्योग केंद्राने दखल घेतली असुन सन २०२१ साला करिताचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जाहिर करण्यात आला आहे. 

 सौ. योगिता माळी व त्यांचे पती श्री. अनिल माळी हे गेली अनेक वर्षे झाली गारमेंट या कापड क्षेत्रात अविश्रांत मेहनत घेत आहेत. या‌ त्यांच्या फर्ममुळे शहरासह वाळवा - शिराळा तालुक्यातील होतकरू व गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या माळी कुटुंबाने कोरोणा काळात तर सामाजिक बांधिलकीच्या संकल्पनेतून विविध ठिकाणी धान्यांचे वाटप तसेच मास्क, हँड सनिटायझर, हँडवॉश चे अनेक ठिकाणी मोफत वाटप केले आहे.  या भयावह काळात काम करणाऱ्या आशा वर्कर्स, तसेच डॉक्टर्स यांना लागणारे साहित्य पी. पी. किटस् चे वाटत केले आहे. अनेक गोर गरीब कुटुंबात कपड्यांचे व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप ही केले आहे.

या वर्षीचा सांगली जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सौ. योगिता माळी यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post