ओबीसी, व्हीजे-एनटी जनमोर्चा च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन




छत्रपतींनी शुन्यातून विश्व निर्माण करुन जनतेला स्वातंत्र्य बहाल केले - विक्रम राठोड


     नगर -शुन्यातून विश्व निर्माण करुन जनतेला भयमुक्त जीवन जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी छत्रपतींचे राज्य त्या काळातील स्वातंत्र्य जनतेला बहाल केले होते, म्हणून राजे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युग पुरुष ठरले, असे मत माजी नगरसेवक युवा नेते विक्रम राठोड यांनी व्यक्त केले.


     ओबीसी, व्हीजे-एनटी जनमोर्चाच्या नगर शहर व जिल्हा शाखेच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री.राठोड व ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते.


     जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, जि.उपाध्यक्ष अनिल इवळे, महिला प्रतिनिधी छाया नवले, राजू मंगलाराम्, नईम शेख, रमेशजी सानप, राजेंद्र पडोळे, पंडितराव खरपुडे, डॉ.श्रीकांत चेमटे, रजनी ताठे, श्रीकांत मांढरे, संजय सागावकर, कैलास दळवी, डॉ.सुदर्शन गोरे, राजु देठे, मनोज भुजबळ, सौ.वैशाली उदावंत, सौ.सुषमा पडोळे, संपुर्णा सावंत, अनंत देसाई, कु.श्रावणी व ईश्वरी भुजबळ आदि यावेळी उपस्थित होते.


     प्रारंभी श्री.इवळे यांनी प्रास्तविक केले तर शेवटी संजय सागावकर यांनी आभार मानले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post