नगर - नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे शिवसेना बांधणीत मोठे योगदान राहिले आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक असलेल्या ना.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्री मंडळात सार्वजनिक बांधकाम व नगरविकास खात्याचा उत्कृष्ट कारभार करत आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे. यांनी नगरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातून अहमदनगर महानगरपालिकेच्या विविध अडचणी सोडून निधीची तरतुद केल्याने अनेक योजना मार्गी लागल्या आहेत. त्याचप्रमाणे नगरमध्ये शिवसेनाचा महापौर करण्यात त्यांची भुमिका महत्वपूर्ण राहिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या दिर्घायुष्याची मनोकमना करत असल्याचे शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.
नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शिवसेनेच्यावतीने मुंबई येथे ना.एकनाथ शिंदे यांचा शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे आदि उपस्थित होते.
यावेळी संजय शेंडगे यांनीही ना.शिंदे यांचे महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्यावतीने अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी ना.शिंदे यांनी नगरमधील शिवसेनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच महानगरपालिके विषयी माहिती घेतली. तसेच नगरमध्ये आपण लवकरच येऊ, असे सांगितले.
------
Post a Comment