नगर( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपनगर शिवसेना विभाग प्रमुख काका शेळके यांच्या संकल्पनेतून इसळक येथील निसर्गसृष्टी गोपालन संस्थेतील
गोमाता अर्थांत गायीला टेम्पो भरून भाजीपाल्याचे माजी नगरसेविका कलावती शेळके यांच्या हस्ते वाटप केले.यावेळी लक्ष्मण शेळके, सागर गायकवाड, अमोल शेळके,शारदा शेळके, समर्थ शेळके व संग्राम शेळके आदी उपस्थित होते.
काका शेळके म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुक्या प्राण्यांच्या मुखात अन्न देण्याचे काम शेळके परीवारांच्या माध्यमातून आम्ही केले.अखंड हिंदुस्थानचे दैवत शिवाजी महाराज यांनाही हेच अभिप्रेत आहे. जयंतीनिमित्त हा छोटासा खारीचा वाटा उचलत आहे.
Post a Comment