नगर - एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रस्तुती व शस्त्रक्रिया या स्थितीत रुग्णांना अत्यक्षिक रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्याचवेळी गरज रक्ताची असते. यामुळे रुग्णाचे प्राण वाचतात. तेव्हा स्वयंसेवकांनी रक्तदानातून समाजसेवा करावी. ‘रक्तदान करु या अनेकांना जीवनदान देऊ या’ हा संकल्प करुन रक्तदान हेच जीवनदार आहे, याचे महत्व कमात घ्यावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.महावीरसिंग चौहान यांनी केले.
विळद घाट येथे डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.चौहान होते. यावेळी डॉ.विखे पा.मेमोरियल हॉस्पिटलयचेवतीने झालेल्या रक्तदानशिबीरात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ.निधी काकड, डॉ.रविंद्र माघरडे, प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, उपप्राचार्य डॉ.एच.एल.शिरसाठ, प्रा.डॉ.एस.बी.राऊत, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.चौहान पुढे म्हणाले, रक्तदान शिबीरात स्वेच्छतेने केलेले रक्तदान नक्कीच कोणाला तरी उपयोगी पडते व त्यामुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे महत्व या शिबीराच्या माध्यमातून घ्या, असे सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ.धोंडे यांनी कृषी महाविद्यालय दरवर्षी राष्ट्र सेवा योजना हिंवाळी शिबीरा अंतर्गत विविध उपक्रम राबवित असते. यावर्षी कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबीराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन 25 बॅग रक्त संकलन करता आले. याबद्दल विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले.
प्रास्तविक प्रा.के.एस.दांगडे यांनी केेले, सूत्रसंचालन व आभार नितिशा ब्राह्मणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्य.अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पा., सेक्रेटरी डॉ.बी.सदानंदा, संचालक डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
--------
Post a Comment