25 फेब्रुवारीला मुंबई मेळाव्यास उपस्थित रहा-भुजबळ

राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परिषदेचे मुंबईत आयोजन
समाजाच्या अस्तित्वासाठी नगर जिल्हातील कार्यकर्त्यांनी
25 फेब्रुवारीला मुंबई मेळाव्यास उपस्थित रहा-भुजबळ
     नगर - नाभिक समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने समाजहित व अस्तित्वासाठी मुंबई येथे होणार्‍या राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परिषदेला उपस्थित रहावे. या मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय स्थिरतेसाठी विचारांचे एक व्यासपीठ असल्याने नगर जिल्ह्यातील नाभिक बांधवांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईमधील मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
     यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि.25 फेब्रुबारी 2022 रोजी सकाळी 11 ते 4 वेळेत राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परिषदेस ओबीसी बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार, राज्य बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शना खाली आणि ओबीसी समुहातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
     समाजातील बारा बलुतेदार, अलुतेदार, भटके विमुक्त (एन.टी.,डीएनटी, व्हीजे), एसबीसी, मुस्लिम ओबीसी, एस.टी (आदिवासी), एस्सी यासह इतर सर्व वंचित असलेल्या जात समुहांच्या संवैधानिक अधिकाराची बाजू या परिषदेमध्ये मांडली जाणार आहे. त्यामुळे सामाजिक यशाच्या दिशेने पाऊल उचलले आहे. आपल्या सदृश समाजाशी संवाद व सहकार्यातून सामाजिक व राजकीय चळवळ उभी करणार आहे. तेव्हा सर्वच संघटनांनी दखलपात्र झाले पाहिजे, असे श्री.भुजबळ यांनी म्हटले आहे.
     तरी नगर जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी मुंबई येथे होणार्‍या या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावून आपली ताकद दाखवून द्या, असे श्री.भुजबळ यांनी पत्रकात स्पष्ट केले.
---------
     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post