राजवाडाः वडगाव निंबाळकर;- लेखक प्रा. वाव्हळ

                             वडगाव या नावातच ऐतिहासिक पण दडलेलं आहे. आपल्याकडे  वडगाव गुप्ता व  वडगाव तांदळी या गावात ऐतिहासिक पाऊल खुणा पाहायला मिळतात . आज असेच एक वडगाव जे ऐतिहासिक आहे.  या वडगावचं नाव आहे  'वडगाव निंबाळकर' ते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पश्चिम भागात वसले आहे .  वडगाव निंबाळकर हे गाव बारामतीच्या पश्चिमेस एकवीस किलोमीटर अंतरावर आहे . ते बारामती तालुक्यातील एक सुसज्ज  बाजारपेठेचे गाव आहे.  तसेच ते कोऱ्हाळे बुद्रुक या गावाच्या पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर आहे.  वडगाव निंबाळकर या गावातून फेरफटका मारतांना  हे गाव अतिशय समृद्ध ,संपन्न व ऐतिहासिक वारसा लाभलेले जाणवते.   तसेच या गावामध्ये पांडव कालीन मंदिर आहे.  या गावात भैरवनाथ ही ग्रामदैवत आहे.  तसेच विष्णूचे देखील येथे एक मंदिर आहे . भैरवनाथ मंदिरा जवळील दगडामध्ये कोरलेले कृष्णाचे शिल्प आपले लक्ष वेधून घेते.  या गावाला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ,तो म्हणजे निंबाळकरांची गडी. स्थानिक लोक त्यास ' राजवाडा ' म्हणतात.   ही ऐतिहासिक वास्तू वडगाव निंबाळकर या गावात दृष्टीस पडते.  या गढीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गढी आयताकृती असून तटबंदी अत्यंत सुसज्ज स्वरूपाची आहे.   या गडी ची तटबंदी ओबडधोबड आणि घडीव दगडांनी बांधलेली आहे.  तसेच लाकडी तुळ्यावर कोरीव काम आकर्षक आहे.  या  ठिकाणी महसूल जमा करणे आणि स्वसंरक्षण करणे या कामासाठी या गढीची निर्मिती झालेली होती.  वडगाव निंबाळकर हे गाव नीरा नदी काठी वसलेले आहे, ते नीरा नदी पासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे . नीरा नदी भोर तालुक्यातील शिरगाव येथे नीराबावी येथे उगम पावते . नीरा बावी येथील पांडव कालीन पाण्याच्या कुंडाच्या गोमुखातून नीरा उगम पावते व ती पुढे पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यातून वाहते . या निरेचा शांत प्रवाह मनाला प्रसन्नता मिळवून देतो.  या गावापासून वाहणारी निरा  पात्रांमध्ये  देवीच मंदिर आहे त्या  मंदिराजवळ पोहोचण्यासाठी छोट्या छोट्या होडी किंवा नावांचा उपयोग करावा लागतो.  निराचे विशाल पात्र पाहून  हरकून जातं.  नीरा नदीवर वीर धरण, भाटघर, धरण नीरा- देवधर धरण अशी धरणे बांधलेली आहेत.  या नदीच्या पाण्याचा उपयोग या परिसरातील शेतीसाठी प्रामुख्याने होताना दिसतो.  थोडक्यात नीरा ही या परिसरातील जीवनवाहिनी आहे . तीन इथं सुबत्ता आणली.   निरेचा उपयोग जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.  नीरे च्या ऐईल तीरावरती वडगाव निंबाळकर वसले आहे . ते निंबाळकरांचे वतनाचे गाव आहे . सध्याची जी गढी ची अवस्था आहे.  ती मोठी दयनीय स्वरूपाची पाहावयास मिळते . कारण या गढी दुरावस्था झालेली आहे ती दुरून लक्षात येते. वडगाव निंबाळकर मध्ये प्रवेश करतात उजव्या बाजूला काट्याकुट्यांनी वेढलेल्या ठिकाणी या गडीचे अवशेष दृष्टीस पडतात.  निंबाळकरांची गढी पुर्वी वडगाव निंबाळकर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेली होती.  या गढीने सुमारे 25 गुंठे क्षेत्र व्यापलेले आहे . तसेच ती दक्षिणोत्तर विस्तार असलेली आहे या गढीचे एकूण  दीडशे ते सव्वाशे फूट इतके क्षेत्र गडीने व्यापलेले आहे तर तटबंदी आठ ते दहा फूट रुंद असून या तटबंदीची उंची सुमारे 22 ते 25 फूट आहे . निंबाळकरांच्या गडीची तटबंदी निरीक्षण केले असता तटबंदीची आतील भिंत चिकन मातीने बांधलेली दिसते , या तटबंदीवर बांधकाम करताना संरक्षणासाठी खास व्यवस्था केलेली दिसून येते . बांधकामात बंदुकीचा मारा करण्यासाठी ठिकाणी ' जंग्या' ठेवलेल्या आहेत जंग्या म्हणजे भिंतीमध्ये असे तिरपे होल की, ज्यातून शत्रूवर प्रहार करता येईल मग तो बंदूक असो किंवा गरम तेल , पाणी या साह्याने शत्रूला तोंड देता येईल अशी व्यवस्था म्हणजे जंग्या होय.  थोडक्यात संरक्षणाच्या दृष्टीने केलेली व्यवस्था किंवा बांधकाम होय.  राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे .  गढीच्या मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना सदृश्य बांधकाम  येथे पूर्वी असावे असे जाणवते . पुढे या गढीच्या वारसदारांनी या गढीची देखभाल व्यवस्थित न केल्यामुळे ती सध्या  पडलेली दिसते. तीची पडझड झालेली असून तसेच झाडी वाढली आहेत. मात्र वडगाव निंबाळकर येथे असलेली ही ऐतिहासिक वास्तूची बाहेरील तटबंदी सुस्थितीत आहे .                                  वडगाव निंबाळकर या गावातील ऐतिहासिक वास्तू चा संदर्भात काळ निश्चित करताना अभ्यासकांमध्ये मतभेद दिसतात . या गावचे या गडी चे मालक श्री संग्राम राजेनिंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घडी सुमारे चारशे वर्ष जुनी आहे . येथे छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे . त्यांच्या मतानुसार येथे छत्रपती शिवराय आपले सासरे निंबाळकर यांच्या मृत्यूच्या वेळी येऊन गेलेले होते.  तर येथील एका  शिलालेखावरील सदंर्भानुसार ती अलिकडच्या काळातील असावी. किंवा तो  शिलालेख नंतर कोरलेला असावा.  तसेच पुढे पानिपत 1761 च्या महा रणसंग्रामा मध्ये निंबाळकर राजवंशातील अनेक वीर कामी आलेले होते.                                        वडगाव निंबाळकर या ऐतिहासिक गावांमध्ये असणारी दुसरी महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू म्हणजे घुमट होय ही वास्तू येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस जाधव गल्ली आहे या जाधव गल्ली जवळ निंबाळकर यांची शेती आहे याच शेतामध्ये घुमट नावाची टुमदार ऐतिहासिक वास्तू  आहे, ही वास्तू राजे निंबाळकर वंशातील कोण्या एका श्रेष्ठ व्यक्तीची समाधीस्थळ असावे असे या वास्तूच्या रचनेवरून लक्षात येते.  ही वास्तू छोटीशी असून आकर्षक बांधकामासाठी ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची वाटते .        वडगाव निंबाळकर या गावाचे वर्णन ' माणसे ही अशीच ' या पुस्तकामध्ये आढळते.  पां. सी.  घारे या लेखकाने सन 1953 च्या काळात अत्यंत सुंदर पद्धतीने  वडगाव निंबाळकर या गावाचे वर्णन केलेले आहे .                                                   तसेच वडगाव निंबाळकर या गावाला काही सामाजिक संदर्भ ही आढळतात. रामनाथ नामदेव चव्हाण आपल्या ' जाती आणि जमाती' या ग्रंथात पान 150 वर  वडगाव निंबाळकर हे गाव काही वर्षापूर्वी " टका-यांचे वडगाव"  म्हणून ओळखले जात होते.                     लेखक ः    प्रा. नवनाथ काशिनाथ वाव्हळ,             इतिहास संशोधक ,  9881827834 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post