अ.भा. मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखा पदाधिकारी निवड,युवा नाट्यकर्मींचा समावेश

अहमदनगर- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखा पदाधिकारी यांची नव्याने निवड करून युवा कलाकारांचा समावेश करून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला.नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच नूतन कार्यकारिणीच्या बैठकीत लवकरच ‘ कलारंग महोत्सव ‘२०२२ आयोजित करावा असा निर्णय घेण्यात आला अशी माहिती अध्यक्ष .अमोल खोले यांनी दिली.सर्व जेष्ठ सदस्यांनी नाट्य परिषदेचे कार्य अधिक व्यापक व्हावे,नवीन सदस्यांना संधी मिळावी या हेतूने जेष्ठ आणि युवा नाट्यकर्मी यांचा समावेश असलेली ही कार्यकारिणी अहमदनगरच्या नाट्य-सांस्कृतिक चळवळीला अधिक सशक्त करील असा विश्वास या वेळी उपाध्यक्ष शशिकांत नजन  यांनी व्यक्त केला.
प्रमुख कार्यवाह .सतीश लोटके यांनी यावेळी नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड बाबत माहिती दिली.
अध्यक्ष- श्री.अमोल खोले, उपाध्यक्ष- श्री.शशिकांत नजान
श्री.श्याम शिंदे  तर प्रमुख कार्यवाह- श्री.सतीश लोटके, कार्याध्यक्ष- श्री.अभिजित दळवी , कोषाध्यक्ष - तुषार चोरडिया , सहकार्यवाह - अविनाश कराळे, सागर मेहेत्रे ,  संघटक- विलास कुलकर्णी ,  प्रवक्ता- संजय घुगे , प्रमुख सल्लागार -  सतीश शिंगटे
कार्यकारिणी सदस्य म्हणून  सुनील राऊत, योगेश विलायते, पुष्कर तांबोळी, गणेश लिमकर , अभिजित दरेकर, नाना मोरे, शुंभागी कुंभार, विशाल कडुसकर, शिवाजी शिवचरण,  शेखर वाघ , राजेंद्र साबळे, सुशांत घोडके यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post