नगर : मूळचे पोतराज असणारे,रामवाडी (सर्जेपुरा) येथील प्रभागाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक,कलावंत आणि समाजसेवक म्हणून नावाजलेले नेते भाऊसाहेब उडाणशिवे यंदाच्या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या "समाजभूषण" पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर आणि लोकरंग बहूउद्देशीय संस्था वडाळा महादेवच्या करियर कॉम्प्युटर श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराची घोषणा केली असून नगर शहरासह जिल्ह्यातून श्री.उडाणशिवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि गलिच्छ वस्ती - झोपडपट्टी नागरी प्रश्नांबरोबर या वस्तीतील लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न श्री.उडाणशिवे यांनी सातत्याने मांडले आहेत. त्याच बरोबर कागद काच पत्रा वेचक संघटनेचे ते संस्थापक,अध्यक्ष आहेत, शाहीर व लोककलावंत तसेच दूरदर्शन व आकाशवाणी कलावंत म्हणून त्यांची राज्यात ख्याती आहे. 'पहाट व्यसन मुक्तीची' आणि 'मृत्यूशी लग्न' या नाट्य संहितांचे लेखनही त्यांनी केले आहे.महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून 'अपना उत्सव' या भारत सरकारच्या व 'भारत महोत्सव' या केरळ मधील सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. नगरसेवक म्हणूनही त्यांचे कार्य आहे.नागरी समस्या सोडवून शहर विकासाला हातभार लावला आहे.दलित समाज आणि शहरातील दलित वस्ती,झोपडपट्ट्या.चे प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडून मिळालेल्या संधीचा जनतेला लाभ मिळवून दिला. नगर विकासासाठीही त्यांचे मोठे योगदान आहे.
सोमवारी दि.२० डिसेंबर रोजी इच्छामणी मंगल कार्यालय नेवासारोड श्रीरामपूर येथे या पुरस्काराचे वितरण होणार असून,पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातील अनेक भागात छोटेखानी समारंभात सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
Post a Comment