निशांत'दिवाळी अंकाने नगरचे नाव साहित्य क्षेत्रात उंचावले :-कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)दिवाळी म्हणले कि सगळंच झगमगाट कपडे ,फटाके ,दिवे ,रोषणाई ,पाहुणे ,नवीन खरेदी ,वेगवेगळे खमंग पदार्थ चिवडा, लाडू, करंजी ..पण ..पण ..पण ..एका गोष्टीचा उल्लेख केल्या शिवाय दिवाळीला दिवाळीच म्हणता येणार नाही. ती म्हणजे दिवाळी अंक दिवाळीची चाहूल लागताच बाजारात जसा उत्साह येतो तसा साहित्य प्रेमीही ज्याची वाट पाहत असतात असे दिवाळी अंक बाजारात अवतरतात .कल्पना करा फराळाची डिश एका हातात आणि एका हातात दिवाळी अंक.अहो असे असल्याशिवाय दिवाळीची मजाच नाही .राजकारण ,साहित्य, क्रीडा ,वैद्यक ,व्यापार ,शृंगार विनोद ,ज्योतिष ,आयर्वेद ,असे अनेक विषयावरील दिवाळी अंक बाजारात आहेत.वाचकांच्या पसंतीस उतरलेले अंक आपले सातत्य टिकवून आहेत .असाच एक आपल्या नगरचा दिवाळी अंक 'निशांत'. गेली अनेक वर्षे वाचकांच्या पसंतीस उतरल्याने दिवाळी अंकांच्या स्पर्धेत आपले पाय घट्ट रोवण्यात 'निशांत' यशस्वी ठरला आहे.आकर्षक मुखपृष्ठ ,दर्जेदार छपाई आणि वाजवी किंमत हे निशांत चे वैशिष्ट्य म्हणता येईल .'निशांत' दिवाळी अंक विविध विषयांवरील तज्ञ आणि नामवंत लेखकांच्या लेखांनी समृद्ध आहे.दिवाळीचा खरा फराळ म्हणजे 'निशांत' या अंकाने नगर जिल्ह्याचे नाव साहित्य क्षेत्रात उंचावले असे मत गजानन कुलकर्णी यांनी व्यक्त केले यंदाच्या निशांत दिवाळी अंकात 'सक्षम सहिष्णू उद्याची पहाट' हा ले.जन.दत्तात्रय शेकटकर अजित अभ्यंकर यांचा लेख,वैद्यक क्षेत्रातील बाजारीकरण आणि नफेखोरी वर मार्मिक विनोदी अंगाने स्पर्श करणारा 'खायचे दात हा नागेश शेवाळकर यांचा लेख ,विनायक तांबेकर,सलीम पठाण ,अनिल आठल्ये पेक्षा एक सरस लेखांनी 'निशांत 'वाचकांचे लक्ष वेधून घेतो.गांधी ते मोदी ..म्हणजे महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदी दोघेही निशांत अंकात आहेत .अजून काय सांगायचे निशांत बद्दल ?अजूनही बरच काही या दिवाळी अंकात आहे.अहो पण त्याकरिता अंक खरेदी करायला हवा असा सल्ला ही कुलकर्णी यांनी दिला आहे.
Post a Comment