नजान,झावरे,चोरडिया ,खरात,
अल्समराव यांचा राज्याच्या मंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
अहमदनगर-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात गरजू कलावंतांना मदत करण्यात आली. समाजातील महत्वाचा घटक असणाऱ्या कलाविश्वाच्या मदतीला ठाम उभे असणारे सांस्कृतिक योध्ये सर्वश्री शशिकांत नजान,क्षितिज झावरे, तुषार चोरडिया, किरण खरात, सॅमसन अलसमराव यांचा कोरोना योद्धा "सांस्कृतिक नायक" हा पुरस्कार नाट्य परिषदेचे विश्वस्त व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री .उदयजी सामंत यांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष .अमोल खोले व प्रमुख कार्यवाह .सतीश लोटके यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात संचारबंदी असताना केवळ कलाकारांचे आर्थिक, कौटुंबिक, अडचणी दूर करण्यासाठी अहोरात्र श्रम करणाऱ्या या योध्यानी रक्ताची नाती दूर जात असताना स्वतः अनेकांच्या परिवाराचे रक्षक म्हणून कार्य केले. कोणी कलावंत उपाशी झोपू नये म्हणून किराणा किट, फूड पॅकेट वाटप करून मोठे कार्य केले, रूग्णांना रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यासाठीही या योध्यानी प्रयत्न केले. या योध्यांच्या कार्याला सन्मान द्यावा या हेतूने नाट्य परिषद अहमदनगर शाखेने कोरोना योध्या "सांस्कृतिक नायक" या पुरस्कारा साठी वरील कलाकाराची निवड केली आहे.
दि १९ रोजी माऊली सभागृह अहमदनगर येथे दुपारी १:०० वाजता नाट्य परिषदेचे विश्वस्त व उच्च तंत्र शिक्षण मंत्री .उदय सामंत यांच्या हस्ते.आमदार .संग्राम भैय्या जगताप,महापौर सौ.रोहिनीताई संजय शेंडगे ,उपमहापौर .गणेश भोसले तसेच नाट्य परिषद पदाधिकारी,शहरातील जेष्ठ नाट्यकर्मी व नाट्य संस्थांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमानंतर मा.मंत्री महोदय महानगरपालिका नाट्य गृहाच्या बांधकामाची पाहणी करणार आहेत.
Post a Comment