नगरच्या खेळाडूंनी शहराचा नावलौकिक वाढविला - किरण काळे


नगरच्या खेळाडूंनी शहराचा नावलौकिक वाढविला - किरण काळे ;
काँग्रेस क्रीडा विभाग तर्फे फुटबॉल, आर्चरी खेळाडूंचा सत्कार
-------------------------------------------------------------
अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहराने आजवर अनेक चांगले खेळाडू राज्य आणि देशाला दिले आहेत. क्रिकेटपटू जहीर खान, भारतीय कबड्डी संघाचा माजी कप्तान पंकज शिरसाठ याच्यानंतर देखील ही परंपरा कायम असून नेपाळच्या पोखरा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये नगरच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाला गवसणी घालत खेळाचे उत्तम प्रदर्शन केल्यामुळे या खेळाडूंनी शहराचा नावलौकिक वाढविला असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.*

शहर काँग्रेस क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या पाटील यांच्या पुढाकारातून नुकताच शहरातील फुटबॉल, आर्चरी खेळाडूंचा सत्कार सोहळा काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे आदी उपस्थित होते.

नेपाळच्या पोखरी येथे नुकत्याच आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये अहमदनगरच्या ओमकार नरवडे, योगेश तुपे, ऋषी कनोजिया या खेळाडूंनी जोरदार प्रदर्शन करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. हे सर्व खेळाडू गुलमोर फुटबॉल क्लब अकॅडमीचे खेळाडू असून राष्ट्रीय खेळाडू व पंच प्रसाद पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

त्याचबरोबर चाळीसाव्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप धनुर्विद्या स्पर्धेमध्ये शहरातील अनीरुद्ध साळवे या विद्यार्थ्याने झारखंड राज्यातील टाटानगर येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. कुष्ठधाम रोडवरील आर्चरी अकॅडमी येथे सराव करणाऱ्या अनीरुद्ध याला राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच अभिजीत दळवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

किरण काळे म्हणाले की, चांगले क्रीडापटू घडविण्यासाठी चांगल्या क्रीडा प्रशिक्षकांची गरज असते. नगरच्या खेळाडूंचे हे भाग्य आहे की विविध खेळांसाठी नगर शहरामध्ये राष्ट्रीय स्तरावर नाव संपादन केलेले खेळाडू क्रीडा प्रशिक्षक म्हणून विविध स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून नगर शहरातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत.

प्रवीणभैय्या गीते पाटील म्हणाले की खेळाडू खूप मेहनत घेतात. क्रीडा प्रशिक्षक देखील त्यांना घडविण्यासाठी कष्ट घेतात. जर खेळाडूंना व क्रीडा प्रशिक्षकांना अधिक उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा नगर शहरामध्ये उपलब्ध झाल्या तर अजून दर्जेदार खेळाडू नगर शहरातून निर्माण होत नगर शहराचा नावलौकिक वाढविणारी कामगिरी निश्चितपणे करतील. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस क्रीडा विभागाच्या माध्यमातून यासाठी महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही यावेळी गीते यांनी खेळाडूंना दिली. 

*फोटो ओळी :* नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा तसेच झारखंड येथे पार पडलेल्या चाळीसाव्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या खेळाडूंनी संपादन केलेल्या यशाबद्दल काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी काँग्रेस क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू प्रवीण भैय्या येथे पाटील, शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे आदी उपस्थित होत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post