जागतिक टपाल दिनानिमित्त झूम द्वारे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबदल👇

अहमदनगर (प्रतिनिधी)विश्व व राष्ट्रीय डाक दिनाचे औचित्य साधत स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्रि स्कूल च्या विद्यार्थ्यांना केडगाव पोस्ट ऑफीसचा ऑनलाइन पद्धतीने   फेरफटका व विस्तृत माहिती श्री. संतोष यादव साहेब यांनी दिली तसेच पालकांना पोस्ट ऑफिस मधील विविध बचत योजना याविषयी अवगत करण्यात आले सुकन्या योजनेत  सहभाग घेऊन मुलींचे पुढील आयुष्य आर्थिक दृष्ट्या सुखकर कसे करता येईल याविषयी देखील पालकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले    . संतोष यादव साहेब सब पोस्ट मास्तर अहमदनगर  एस ओ  केडगाव यांनी प्रि स्कूल मधील मुलांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करताना पोस्टकार्ड संकल्पना, अंतर्देशीय पत्र संकल्पना व त्याचे महत्त्व तसेच त्याचे होणारे दळणवळण व व्याप्ती याविषयी प्रत्यक्ष पोस्टकार्ड व अंतर्देशीय पत्र दाखवून अवगत केले याच प्रसंगी शाळेच्या शिक्षिका दिपाली भोसले व अमरीन सय्यद  यांच्या मार्गदर्शनाखाली  या प्रसंगी पत्र पेटीची प्रतिकृती सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने उत्साही वातावरणात बनवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका   श्रीम . दिपाली सखाहरी भोसले व सौ अमरीन अझहर सय्यद यांनी केले  तसेच श्री. प्रविण साळवे संस्थापक सचिव यांनी प्रमुख मान्यवर वक्ते श्री संतोष यादव साहेब यांचे स्पर्श सेवाभावी संस्था ऑर्किड प्रि स्कूल आलमगीर यांच्या वतीने आभार मानले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post