गणेशोत्सव - नवरात्राच्या काळात महिलांनी सतर्क रहावे- पो.नि.ज्योती गडकरी

 
  गणेशोत्सव - नवरात्राच्या काळात  महिलांनी सतर्क रहावे
- पो.नि.ज्योती गडकरी
नगर - महिलांनी दागिन्यांची हौस नक्की करावी, मात्र मंगळसूत्र चोरांपासून सावध राहून आयुष्य भराची जमापुंजी क्षणार्धात जाणार नाही, याची काळजी स्वत:च घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या लॉकर्समध्ये सोने व मौल्यवान वस्तू ठेवणे कधीही चांगले असते. गणेशोत्सव - नवरात्राच्या काळात महिलांना सोने व मौल्यवान वस्तू परिधान करण्याची हौस असते. मात्र नेमक्या याच काळात सर्वाधिक चोऱ्या होत असतात. त्यामुळे महिलांनी सतर्क रहावे, असे आवाहन तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांनी केले.
कजबे वस्ती परिसरातील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमाची महिलांनी माहिती दिल्यानंतर व महिलांना सर्व उपक्रमात सहभागी करून घेतले जाते म्हणून त्यांनी विशेष कौतुक केले याप्रसंगी सौ.शोभा दातीर, जयश्री जायकर, मेघा काळे, अंकिता सानप, वैशाली डफळ, ज्योती वाव्हाळ, वृषाली शिरसाठ, पुनम भोर, ज्योती घाडगे, सौ .खांदवे मंडळाचे अध्यक्ष निशांत दातीर, कुणाल जायकर, प्रा.चंद्रकांत वाव्हाळ,  गणेश भोर, चंद्रशेखर  शिरसाठ, विशाल गुंजाळ, युवराज कजबे, सुरेश जायकर, प्रा.हेमंत कुटे जगदीश सानप, श्रेयश कडूस, हर्ष वाकोडे, श्रीहरी शिंदे,यश सुरम आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना गडकरी म्हणाल्या की, सध्या सर्वत्र कोरोना या महामारीचे संकट असतांना सण उत्सव साजरे करतांना प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. आरोग्याबरोबरच संरक्षणाचीही प्रत्येक कुटूंबियांनी जबाबदारी उचलली पाहिजे. विस्ताराने वाढलेल्या सावेडी उपनगरात पोलिस सर्व भागात पोहचू शकत नाही.लोकसंख्या व पोलीस संख्या आणि असलेला भाग पाहता नागरिकांनीही शक्य झाल्यास रात्री-अपरात्री संशयितरित्या फिरणार्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. कॉलनी व परिसरातील महिलांनी व्हॉटसअप् ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्टींग राहणे  काळाची गरज आहे. पोलिसांशी संवाद साधला तर अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. असे सांगून त्यांनी महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. 
----------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post