महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२६ व्या पुण्यतिथी निमित्त चौंडी येथे अभिवादन
अहमदनगर(प्रतिनिधी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२६ व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगांव चौंडी , ता . जामखेड , जि अहमदनगर येथे पुष्पहार अर्पण करून व पुष्पवृष्टीने अभिवादन करण्यात आले .
यावेळी चौंडी विकास योजनेचे शिल्पकार , महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक , महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . अण्णासाहेब डांगे ( आप्पा ) , महाराष्ट्राचे माजी मंत्री मा . प्रा . राम शिंदे , माजी आमदार अँड . रामहरी रूपनवर , महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे , महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीरामभाऊ पुंढे , प्रदेश सरचिठणीस श्री . सुनिलभाऊ वाघ , मल्हार सेनेचे सरसेनापती श्री . बबनराव रानगे , कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा . प्रा . अंकुशराव निर्मळ , सांस्कृतीक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा . प्रा . अरूण घोडके , अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा मा . डॉ . अलकाताई गोडे , उमेश घुरडे , व्यंकटराव मोकले , संदीप तेले , छगनराव नांगरे , अमर ढोणे , सुनिल मलगुंडे , प्रकाश कनप , सुनिल शिनगारे , गणपती वाटेगांवकर , बाबुराव बोडके , डॉ . पांडूरंग टोणपे , सुभाष करे , महेंद्र सोनावणे , नानासाहेब मगदुम यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व गांवकरी मंडळी उपस्थित होते . कोरोणा साथीच्या सर्व नियमांचे पालन करून पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले ,
Post a Comment