शब्दगंध च्या तालुका शाखा सुरू :सुनील गोसावी


काष्टी : ग्रामीण भागातच कसदार लेखन करणारे साहित्यिक असुन त्यांच्या साठी साहित्यिक चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे,ही गरज ओळखून शब्दगंध च्या तालुका शाखा सुरू करण्यात येत आहेत,* असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले.
         काष्टी येथे श्रीगोंदा तालुक्यातील नवोदित साहित्यिकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.नवोदित लेखक,कवी संतोष शिंदे यांनी तालुक्यातील नवोदित लेखक, कवी,साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींची माहिती दिली व शब्दगंध ची शाखा स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली,लवकरच तालुक्यातील नवोदितांची बैठक बोलावून संस्थेची सविस्तर माहिती देण्यात येईल, त्यानंतर अध्यक्ष राजेंद्र उदागे,कवी सुभाष सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यकारी मंडळ निवडले जाईल.यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील नवोदित साहित्यिकांनी मो.७७२१०४५८४५ किंवा ९९२१००९७५० वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे, 
यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक भोसले,कवी संतोष शिंदे यांच्या हस्ते  सुनील गोसावी यांचा पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आला.अजय सुर्यवंशी, वसंत गिरी यांच्यासह नवोदित साहित्यिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post