अहमदनगर : जुन्या आठवणीत प्रत्येकजणाला रमण्यात आनंद मिळत असतो. त्यातल्या त्यात जु्न्या व आनंददायी आठवणी स्वतः जवळ न ठेवता त्या दुसऱ्यांसमोर व्यक्त करण्यामधील समाधान वेगळे असते. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील कजबे वस्ती येथील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या आरतीला गेल्यानंतर त्यांच्या तरुणपणातील गणेशोत्सवातील आठवणींना उजाळा मिळाला. त्या आठवणी त्यांनी या वेळी गणेभक्तांसमोर मांडल्यानंतर सर्वजण मंत्रुगध्द झाले.
कजबे वस्ती परिसरातील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी, अध्यक्ष निशांत दातीर, कुणाल जायकर, दत्ताराय सुरम, अमोल काळे, विष्णु बारगळ, संदीप क्षीरसागर, विशाल गुंजाळ आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करण्याची मजा वेगळी असते. या निमित्ताने सर्वजण जातीधर्म विसरून एकदिलाने एकत्र येत असतात. गणेशोत्सव मंडळांमुळे नेतृत्व करण्याची कला शिकली जाते. या गणेशोत्सव मंडळांत माझ्यात नेतृत्व गुण संपादन झाला. त्यामुळे आज अहमदनगर जिल्हयातील पोलिस खात्याचे नेतृत्व करीत आहे. हे नेतृत्व करताना सर्वांना बरोबर घेऊन कामकाज केले जात आहे. ही सर्व शिकवण गणेशोत्सव मंडळाच्या नेतृत्व गुणातच मिळाली आहे.
गणेशोत्सव काळात मंडळाच्या वर्गणीपासून प्रसाद वाटप करणे, कार्यक्रमांचे नियोजन करणे, आरतीला कोणाला बोलवायचे हे ठरविणे, प्रसाद वाटपाचे नियोजन ते थेट गणेश विसर्जन अन् वर्गणीचा हिशोब हे सर्व गणेशोत्सव मंडळात शिकता येते. त्याचा भविष्यात चांगला फायदा होत असतो. मला त्याचा फायदा झालेला आहे, हे पाटील यांनी श्रोत्यांना त्यांच्या शब्दात सांगितल्याने सगळेच मंत्रमुगध्द झाले हेते.
मंडळाचे अध्यक्ष निशांत दातील यांंनी मंडळस्थापने मागील हेतू व मंडळातर्फे होत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली.
आरतीनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शोभा दातीर, जयश्री जायकर, मेघा काळे, अंकिता सानप, वैशाली डफळ, ज्योती वाव्हाळ, पूनम भोर, ज्योती घाडगे आदींसह गणेश भक्त उपस्थित होते. कुणाल जायकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. हेमंत कुटे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डाॅ. एकनाथ खांदवे यांनी आभार मानले.
Post a Comment