डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणारे आरोपी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

अहमदनगर झोपडी कॅन्टीन येथील प्रकाश वाईन्स या दुकान मॅनेजरचे डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणारे आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

अहमदनगर (प्रतिनिधी)प्रकाश वाईन्स, झोपडी कॅन्टीन, अहमदनगर या दुकानाचे मॅनेजर फिर्यादी आशीर बशीर शेख, वय २९ वर्षे,रा.पंचवटीनगर,भिस्तबाग, सावेडी,अहमदनगर हे रात्री १० वाजण्याचे सुमारास दुकान बंद करुन दिवसभर वाईन शॉपमध्ये जमा झालेली रक्कम बॅगमध्ये ठेवून बॅग मोटार सायकलचे टाकीवर ठेवून घरी निघाले असता सारस्वत बँकेजवळ पाठीमागून काळ्या रंगाची विना नंबर पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे डोळ्यात मिरची पावडर फेकली त्यावेळी फिर्यादी यांनी रस्त्याचे कडेला त्यांची मोटार सायकल उभी केली असता सदर इसमाने फिर्यादी यांचे मोटार सायकल जवळ येवून पुन्हा फिर्यादी यांचे डोळ्यात मिरची पावडर टाकून फिर्यादी यांचे मोटार सायकलचे पेट्रोल टाकीवर ठेवलेली १० लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरुन नेली होती.
सदर घटनेबाबत तोफखाना पो.स्टे.येथे गु.र.नं ८०६/२०२१ भा.द.वि.कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर अहमदनगर पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके यांनी तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हा घडले ठिकाणचे निरीक्षण करुन फिर्यादी यांचेकडून गुन्ह्यातील आरोपी बाबत माहिती घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे आदेशाने पोनि/ अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सुचना देवून आरोपींचा शोधार्थ रवाना केले. त्याप्रमाणे पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोना/रवि सोनटक्के, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, भरत बुधवंत, पोकों/योगेश सातपूते, सागर ससाणे, कमलेश पाथरुट हे गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेत असताना पोनि/ अनिल कटके यांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा प्रकाश वाईन्स या दुकानामध्ये काम करणारा कामगार लखन वैरागर, रा. नागापूर, अहमदनगर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेवून व आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे १) लखन नामदेव वैरागर, वय २९ वर्षे, रा. सेंटमेरी चर्च पाठीमागे, नागापूर, अहमदनगर यास प्रथम ताब्यात घेतले. त्याचेकडे नमुद गुन्हयाबाबत व गुन्ह्यातील साथीदाराबाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर पाच साथीदारांनी मिळून गुन्हा केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे इतर आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे २) प्रमोद बाळू वाघमारे, वय- २३ वर्षे, रा. आण्णाभाऊ साठे समाज मंदीर शेजारी, नागापूर, अहमदनगर, ३) विशाल भाऊसाहेब वैरागर, वय-२५ वर्षे, रा. रस्तापूर, ता. नेवासा, ४) दिपक राजू वाघमारे, वय २० वर्षे, रा. सेंटमेरी चर्च पाठीमागे, नागापूर, अहमदनगर यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. तसेच उर्वरित दोन साथीदारांचा शोध घेतला परंतू ते मिळून आले नाहीत.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील चोरलेल्या रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे वाटणीस आलेली ५ लाख २० हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या ३ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या तीन मोटार सायकल व ४२ हजार ५०० रुपये किंमतीचे चार मोबाईल काढून दिल्याने एकूण ९ लाख २ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पो.स्टे. येथे हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post