इस्लामपूर ( वार्ताहर) गेल्या २० वर्षात दीनदयाळ सुतगिरणीला ४४ कोटीचा नफा झाला असुन याचे श्रेय सभासद , संचालक मंडळ व अधिकारी , कर्मचारी वर्ग यांच्या शिस्तबध्द , काटेकोर कामाची पध्दत यामुळे हे शक्य झाले आहे . अत्यंत काटेकोरपणामुळे सुत गिरणी नावारूपास येत आहे . सभासदांना दर वर्षी भेट वस्तु देणारी देशातील एकमेव सूतगिरणी आहे . सरकारने भाग भांडवल व कर्ज वाटपामध्ये काट छाट केली , भाग भांडवलातही ३ कोटी कमी दिले . पंडीत दीनदयाळजी उपाध्याय यांच्या एकात्म मानवता वाद कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही गिरणी नेहमी कार्यरत असते . अहवाल सालात सूतगिरणीस १ कोटी १८ लाख रूपयेचा नफा झाला आहे . असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . अण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांनी व्यक्त केले .
येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि . , इस्लामपूरच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या २६ व्या वार्षिक साधारण सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते . प्रारंभी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन मा . श्री . अण्णासाहेब डांगे , सूतगिरणीचे चेअरमन श्री . एम . एन . कांबळे , व्हा . चेअरमन श्री . प्रकाश बिरजे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
प्रारंभी वार्षिक साधारण सभेचे नोटीस वाचन सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले , स्वागत व प्रास्ताविक व्हा . चेअरमन श्री . प्रकाश बिरजे यांनी केले . सभेमध्ये श्रध्दांजली , मागील सभेचा वृतांत वाचुन कायम करणे , ३१ मार्च २०२१ अखेर वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल , नफा - तोटा , ताळेबंद व इतर पत्रके , मंजूर अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे , लेखा परिक्षण अहवालाची नोंद घेवून संस्थेने तयार केलेल्या दोष दुरूस्ती अहवालास मान्यता देणे , लेखा परिक्षक , आयकर विक्री कर , अबकारी कर , व कायदा सल्लागारांची नियुक्ती करणेस मान्यता देणे , आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करणे अशा सर्व ठरावावर चर्चा होवून सर्व विषय ऐकमतांनी उपस्थित सभासदांनी हात उंच करून मंजूर केले . अजेंड्या वरील सर्व ठराव व विषयांचे वाचन सूतगिरणीचे संचालक अनुक्रमे चेअरमन श्री . एम . एन . कांबळे , व्हा . चेअरमन श्री . प्रकाश बिरजे , एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे , संचालक श्री . बाळासाहेब खैरे , श्री . अनिल शेटके , श्री . सुमंत महाजन , डॉ . शिवाजीराव ऐडगे , श्री . माणिकराव गोतपागर , सौ . मंगल पवार , श्री . विलासराव काळेबाग , सौ . शोभाताई होनमाने , श्री . अमोल चौधरी या संचालकांनी केले .
संस्थेच्या वतीने अहवाल सालाकरिता आदर्श कामगार पुरस्काराचे वितरण संस्थापक मा . श्री . अण्णासाहेब डांगे व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते वर्षभर चांगले व उत्तमप्रकारे काम केल्याबद्दल प्रथम क्रमांक - श्री . दिपक आनंद थोरात , रेठरेधरण , द्वितीय क्रमांक - श्री . रघुनाथ बाबुराव कळसे , भटवाडी , तृतीय क्रमांक - श्री . सागर अर्जून बडदे , जांभळवाडी , उत्तेजनार्थ - १ ) श्री . दिलिप रामचंद्र कांबळे , नवेखेड , २ ) श्री . विकास तुकाराम खोत , लादेवाडी ३ ) श्री . ज्ञानदेव बाबुराव शिंदे , नवेखेड ४ ) श्री . रामदिनेश शंकर ओरिसा या कामारांना अनुक्रमे ५००० / ३००० / - , २००० / - व संस्थेचे सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले .
यावेळी महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार चेअरमन श्री . एम . एन . कांबळे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , फेटा व पुष्पहार देवून करण्यात आला . यावेळी माजी आमदार श्री . भगवानराव साळुखे , प्रा . अरूण घोडके , जि.प. सदस्य संभाजीराव कचरे , मा . अँड . संपतराव पाटील , यांनी आपली मनोगते व्यक्त केली . सभेस य . मो . कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा . अविनाश खरात , इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा . शहाजी पाटील , माजी नगरसवेक अशोकराव देसाई , किसनराव गावडे , श्री . सी . एच . पाटील , विकास नांगरे , संजय हवलदार , पांडूरंग पाटील , पांडूरंग वाघमोडे , शिवाजीराव डांगे , परेश पाटील , राजेश माने , दिपक आडसूळ , सुमित चंद्रकांत पाटील , संचालक सुमंत महाजन , रमेश वडे , डॉ . शिवाजीराव जाधव , राजेंद्र लोंढे , यांच्यासह अन्य मान्यवर व सभासद उपस्थित होते . वार्षिक साधारण सभेचे संयोजन जनरल मॅनेजर श्री . विनोद देशमुख , फायनान्स मॅनेजर राजेंद्र मिरजे , प्रॉडक्षण मॅनेजर श्री . सुर्यकांत देसाई , गारमेंट मॅनेजर सौ . योगिता माळी , लेबर ऑफीसर श्री . अदित्य यादव, अशोकराव बदडे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बजरंग कदम व प्रा . ए . के . पाटील यांनी केले . शेवटी आभार संचालक मा . श्री . संजय देवकुळे यांनी मानले .
Post a Comment