धनगर समाज एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने राज्यभर मोठा लढा उभारणार
प्रदेशाध्यक्ष - . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे
इस्लामपूर (प्रतिनिधी)
धनगर समाज एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने प्रसंगी राज्यभर मोठा लढा उभारणार असुन सरकार कोणतेही असो समाजाच्या दृष्टीने धनगर आरक्षण लागू होणे ही आज काळाची गरज बनली आहे . राज्य अथवा केंद्र सरकार आरक्षण प्रश्नांवर वेळ काढू पणाची भूमिका घेत आहे असे मत महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी व्यक्त केले .
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ या पाच दिवसात संपूर्ण राज्यभर नजीकच्या ७ ते ८ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रित करून राज्यव्यापी विभागीय व्यापक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते . अनुक्रमे सातारा , मुंबई , जळगांव , शेगांव , अमरावती , नांदेड , बीड , अहमदनगर या जिल्ह्यांच्या ठिकाणी जवळपासच्या ७ ते ८ जिल्ह्यातील धनगर समाजाच्या प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रित करून धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसह अन्य निरनिराळ्या प्रश्नांवर चर्चा व विचार विनिमय करण्यात आला .
या महाराष्ट्र राज्यव्यापी दौऱ्यामध्ये बोलताना प्रदेशाध्यक्ष मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे म्हणाले कि , आरक्षण प्रश्नांवर यापुढे धनगर समाजाला सरकार सोबत आर पार ची लढाई करावी लागेल , आरक्षण हे ओबीसीच्या विकासाचे मुख्य माध्यम आहे . महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला ३० टक्के आरक्षण नोकरी , शिक्षणा प्रमाणेच राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे , केंद्र सरकारने जनगणनेच्या वेळी जातनिहाय जनगणना करायला हवी . तरच कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे . ते समजणार आहे . जाती पाती नष्ट करण्यासाठी जातनिहाय जनगणना नको ही भावना खरी असली तरी सर्व जातींना समान न्याय मिळायलाच हवा अशी आमची मागणी आहे.आगागी काळामध्ये आरक्षण प्रश्नासाठी महासंघाच्या माध्यमातुन राज्यव्यापी तिव्र लढा उभारणार आहे .
या राज्यव्यापी दौऱ्यामध्ये मध्ये महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या बरोबर महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस मा . श्री . सुनिलभाऊ वाघ , मल्हार सेनेचे सरसेनापती श्री . बबनराव रानगे , कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा . अकुंशराव निर्मळ , सांस्कृतीक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा . अरूण घोडके , अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा मा . डॉ . अल्काताई गोडे या सहभागी झाल्या होत्या . दौऱ्यामध्ये अनेक जिल्ह्यात धनगर समाज महासंघ , मल्हार सेना , कर्मचारी संघटना , अहिल्या महिला संघ व सांस्कृतीक विभागातील राज्य व जिल्हास्तरांवर पदाधिकारी यांच्या निवडीच्या घोषणा करण्यात आल्या . राज्यव्यापी दौऱ्याने धनगर समाजातील पदाधिकारी व तरूणांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे . राज्यव्यापी विभागीय बैठकांमध्ये सर्वच ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांचे समाजबांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .
Post a Comment