Mpsc परीक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे धनगर समाजा ची मागणी

Mpsc परीक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे धनगर समाजा ची मागणी 

पुणे - चार सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी एमपीएससीची परीक्षा रद्द करून धनगर समाजाला साडेतीन टक्के च्या प्रमाणात जागा देऊन नंतरच परीक्षा घ्यावी अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार,  दत्तात्रय भरणे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे याना दिले आहे. 
      लोकसेवा आयोगामार्फत घेणेत येणार्‍या वर्ग २ च्या पदाकरीता ४ सप्टेंबर ची परिक्षा होत आहे.  या परिक्षेसाठी प्रथम २८ फेब्रुवारी २०२० ला जाहिरात आली. त्या जाहिरातीमध्ये ६५० जागा पोलिस उपनिरिक्षक पदासाठी मंजूर आहेत. या ६५० जागांत NT क वर्गासाठी फक्त २ जागा दर्शवल्या आहेत. वास्तविक पाहता NT क वर्गासाठी ३.५% आरक्षणाप्रमाणे २३ जागा असावयास हव्या होत्या. मात्र त्यामध्ये या जागा दिसत नाहीत. हा NT क वर्गावर अन्याय आहे.
या बाबत विद्यार्थी आणि समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन आंदोलने झालीत. 
त्या आंदोलनानंतर पद यादी दुरुस्तीची सामाजिक न्याय मंत्री यांनी ग्वाही दिली होती. मात्र १४ जुलै २०२१ रोजीच्या सुधारित जाहिरातीमध्ये NT क वर्गाच्या पदांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
ही बाब जाणीवपुर्वक होत असल्याची समाजभावना निर्माण होत आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये  पुन्हा असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. 
त्यानंतर ४ सप्टेंबरला परिक्षा जाहिर झाल्याने, NT क वर्गातील बर्‍याच स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय होत आहे. विद्यार्थी दिशाहिन होत आहेत.
आमची आपणाकडे विनंती आहे कि आपण हि ४ सप्टेंबर रोजी होणारी परिक्षा रद्द करुन NT क च्या हक्काच्या २३ जागा असलेली जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करावी. आपण पुढील १५ दिवसात हा निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 
परिक्षा रद्द न झाल्यास NT क वर्गातील समुदाय तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडेल. परिणामी ४ सप्टेंबरच्या परिक्षाही बंद पाडण्यास मागेपुढे पाहणार नाही. तसेच न्यायालयातून दाद मागितली जाईल. त्यामुळे निवड प्रक्रियेस पुन्हा विलंब होईल. यामुळे पालक व विद्यार्थी वर्गामध्ये रोष निर्माण झाल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेवर परिमाण झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार सरकार असेल.
असेही निवेदनात म्हटले आहे. 
यावेळी यशवंत सेना महिला आघाडीच्या पद्मावती दूधभाते, सामाजिक कार्यकर्ते अशोक माने, पत्रकार सोमनाथ देवकाते यशवंत सेनेचे संतोष शिंदे, व्यंकटराव नाईक, धनगर समाज सेवा संघाचे बालाजी अर्जुने, उद्योजक बंडू माने, लॉरेन्स गॅब्रियल आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post