-------------------------------------------
सुरांच्या माध्यमातून शब्दांना सौंदर्य देणारा गायक मोहंमद रफी
- अॅड.अमीन धाराणी
-------------------------------------------
नगर- शब्द हे फार काही करु शकते. कवींनी लिहिलेल्या गीतांमुळे माणसाला आकाशात असल्याचे भासावून जाऊ शकते. तर त्याच शद्बांनी माणसाची निचांकी ही होते. अशाच या कवींनी लिहिलेल्या गीतांना जोपर्यंत सुरांची साथ मिळत नाही तो पर्यंत ते रसिकांना आवडत नाही. या कार्यात सुरांच्या माध्यमातून शब्दांना सौंदर्य देण्यात मोहंमद रफि यांचा हातखंडा होता, असे प्रतिपादन संगीतप्रेमी अॅड.अमीन धाराणी यांनी केले.
मखदूम सोसायटी व गाता रहे मेरा दिल ग्रुपच्यावतीने स्व.मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथि निमित्त ‘जिंदगी तो बेवफा है,,, ’चे फेसबुक लाईव्ह आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अॅड. अमीन धाराणी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कमर सुरुर, डाँ. संतोष चेडे, अॅड.गुलशन धाराणी, डाँ.रेशमा चेडे, राज चोटीले, राम खुडे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मोहंमद रफी यांना अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलतांना अॅड.अमीन धाराणी म्हणाले की, आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोर गीतकारांच्या जयंती व पुण्यतिथीच्या माध्यमातून होणार्या या गायनाच्या कार्यक्रमातून नवीन कलाकारांना संधी प्राप्त होत आहे. अशाच कार्यक्रमांद्वारे छोटे कलाकार टी.व्ही. व सिनेमात सुद्धा पोहचत असून, कलाकारांना रोजगार प्राप्त होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात अॅड.अमिन धाराणी यांनी मोहंमद रफी यांचे गाजलेले गीत ‘मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा’ या गीताने प्रारंभ केला. तसेच ‘छलकाऐ जाम’हे गीत सादर करुन चांगली सुरवात केली. यानंतर विजय आँग्रे यांनी '' जिंदगी तो बेवफा है व ‘आजा तेरी याद आई.. हे गीत सादर करुन रसिकांची दाद मिळविली. सुभाष पाटोळे यांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळातील तु ईस तरहा से मेरी जिंदगी व ‘सुहानी रात ढल चुकी न जाने तुम कब आओगे..’ या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर निता माने यांनी '' तेरी आँखों के सिवा दुनिया में व ‘आजा तुझको पुकारे मेरा प्यार..’ या गीतांनी माहोल दाटला. तर रोझ मँडम यांनी '' अकेले हैं चले आओ कहाँ हो व ‘मुझे छू रहि है तेरी गर्म साँसे..’ हे प्रेम गीत सादर करुन वाहऽ वाह ऽ मिळविली.तर डाँ. रेशमा चेडे यांनी जुन्या काळातील '' आदमी मुसाफिर है आता है जाता है '' व ‘कोई जब राह न पाऐ.. तेरी दोस्ती मेरा प्यार..’ हे गीत सादर करुन टाळ्या मिळविल्या. तर विकास खरात यांनी ‘मैने पुच्छा चाँद से..’ हे गीत सादर केले. तर अर्जुन चौरे यांनी ‘लाखों है निगाह में... जिंदगी की राह में..या गीतांना रसिकांची भरपूर दाद मिळविली.
सूत्रसंचालन अॅड. गुलशन धाराणी यांनी केले, प्रास्तविक आबीद खान यांनी केले तर आभार साहिल धाराणी यांनी मानले. कार्यक्रमास मोहंमद रफी यांचे गीतप्रेमी व संगीतप्रेमी आँन लाईन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------
Post a Comment