अहमदनगर :महानगपालिका पालिका हद्दतील उज्वल कॉम्प्लेक्स असलेल्या वड वृक्षास पुरातन पुरातन वृक्ष ( हेरिटेज ट्री ) म्हणून घोषित करण्यात आले.
पुरातन वृक्ष म्हणजे जे कुठलीही महानगर पालिका हद्दीतील 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे वृक्ष असतील त्या वृक्षांच्या संरक्षण व संवर्धन करण्याकरता त्यांची गणना केली जाईल त्याला कुठलीही आणि इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशाप्रकारे अहमदनगर महानगर पालिकेने उपक्रमास सुरुवात केली आहे. या करिता वृक्षाच्या बाजूस फलक लावून त्याची घोषणा करण्यात आली आहे सदर कार्यक्रमाकरिता आमदार संग्राम भैया जगताप, उपमहापौर श्री गणेश भोसले विरोधी पक्षनेते श्री संपत बारस्कर, आयुक्त श्री शंकर गोरे अतिरिक्त आयुक्त श्री पठारे उपायुक्त श्री डांगे, नगरसेवक श्री प्रकाशजी भागानगरे, माजी नगरसेवक श्री संजयजी शेंडगे, माझी नगरसेवक संजय चोपडा उद्यान विभाग प्रमुख मेहेर लहारे हे उपस्थित होते तसेच माळीवाडा वेसच्या मागील बाजूला असलेले हुतात्मा स्मारक हे बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून सुशोभित करण्यात आले आहे त्यांची देखील माननीय आयुक्त साहेब यांनी आभार मानले आहेत.
Post a Comment