हिंगणगाव (ता. नगर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दिलीप झावरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी मोहिनी सोनवणे यांची सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली.
पिठासन अधिकारी म्हणून सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य दिलीप झावरे यांनी नाव सुचवल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य निलम दुबे यांनी अनुमोदन दिले.
गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे उदगार नवनिर्वाचित उपसरपंच मोहिनी सोनवणे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी उपसरपंच दिलीप झावरे,आशाबाई ढगे,बाळासाहेब पानसरे,ग्रामपंचायत सदस्या निलम दुबे,ग्रामपंचायत सदस्य वैभव ढगे,उद्योजक दिपकशेठ सोनवणे,हमीदपूर सरपंच छबुराव कांडेकर,शिवसेना नेते बाळासाहेब ढगे,एकनाथ झावरे सर,माजी ग्रामपंचायत सदस्य केशव सोनवणे,मनोज सोनवणे,संजय शिंदे, संभाजी कोल्हे,भाऊसाहेब सोनवणे, दत्तात्रय सोनवणे,अंजुकाका सोनवणे,निसार पठाण,इन्नूस सय्यद,मुस्ताक सय्यद,रावसाहेब सोनवणे,तेजस सोनवणे,प्रविण सोनवणे,अमोल सोनवणे,मयूर सुंबे तसेच ग्रामविकास अधिकारी सुजाता खर्से उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post a Comment