अहमदनगर (प्रतिनिधी)शिर्डीतील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते के के कांदळकर यांनी आपल्या उच्च शिक्षीत मुलीचा आंतरशाखीय विवाह करुन समाजाला स्वतःपासून एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे...
श्री कोंडाजी कांदळकर (केके) रा. शिर्डी यांची कन्या चि.सौ.का. श्रध्दा व श्री संजय मुरलीधर पानसरे रा. श्रीरामपूर यांचा चि. प्रणव यांचा शुभविवाह मोठ्या शाही थाटामाटात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन सिध्दसंकल्प लॉन्स, शिर्डी येथे दि. २५ जुलै २०२१ रोजी गोरजमुहूर्तावर पार पडला. नवदांपत्याना विवाह प्रसंगी शुभाशिर्वाद देण्यासाठी राज्याचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, अविनाशजी आदिक साहेब, अनुराधाताई आदिक, शिवाजीराजे गोंदकर, सुरेशभाऊ कांबळे, बाबासाहेब कोळपे यासंह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री के के कांदळकर यांची समाजातील सुधारणांसाठी नेहमीच आशादायक धावपळ असते. श्री के के यांचा समाजात मोठा मित्र परिवार, चाहता वर्ग आहे. समाजकाम करण्याचे माध्यमातून मागील २० वर्षापूर्वी श्री संजय पानसरे, श्रीरामपूर यांची मैत्री झाली. मागील कालावधीत श्री के के यांचा मुलगा रस्ते अपघातात जखमी झाल्याने श्री संजय पानसरे हे आपले कुटूंबिंयासह भेटण्यासाठी श्री के के च्या घरी आले. भेटून गेल्यानंतर श्री संजय पानसरे यांनी श्री के के यांच्या मुलीस आपल्या एकुलत्या एक उच्च शिक्षीत मुलासाठी मागणी घातली. श्री के के यांनीही मनात आहेर धनगर किंवा खुटेकर धनगर असा कोणताही विचार न करता स्वतःपासून धनगर समाजातील सुधारणा म्हणून होकार कळवून मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा आयोजीत केला. श्री के के कांदळकर व श्री संजय पानसरे यांनी धनगर समाजासाठी स्वतःपासून दिशादर्शक सुधारणा केली आहे. यापुढील कालावधीत समाजाने फक्त धनगर म्हणून आपल्या मुलामुलींचे विवाह करुन समाजाची विवाहसंस्था समृद्ध करावी, अशी दोन्हीही कुटूंबियांनी अपेक्षा व्यक्त केली...
Post a Comment