जिल्हाध्यक्षपदी मुस्तफा खान तर शहराध्यक्ष जमिलउद्दीन जहागिदार
नगर - ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी मुस्तफा गनी खान, शहर अध्यक्षपदी जमिलउद्दीन सय्यद (कविजंग जहागिरदार) यांची निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष बी.एन.इनामदार, प्रदेश सचिव अॅड.मनोज मिश्रा, उपाध्यक्ष सुनिल शिंदे, वरिष्ठ सल्लागार अॅड.एच.एम.पटेल, सय्यद खलील, निसार बागवान, नसिर शेख आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बी.एन.इनामदार म्हणाले, समाजातील दु:ख, त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीच्या माध्यमातून कार्यकर्ते काम करत आहेत. शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही. मध्यस्ती लोक भ्रष्टाचारासाठी या योजनांचा लाभ संबंधितांना मिळू देत नाही. त्यासाठी संघटना या विरोधात आवाज उठवत आहे. नगरमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटनेशी जोडले जात आहेत. आज नियुक्त झालेले पदाधिकारी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या संघटनेची जबादारी देण्यात आली असून, ते या पदाच्या माध्यमातून अहमदनगर मधील प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी नूतन पदाधिकारी मुस्तफा खान व जमिलउद्दीन सय्यद म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कार्यरत राहू. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे सांगून नियुक्तीबद्दल वरिष्ठ पदाधिकार्यांचे आभार मानले.
याप्रसंगी अॅड.मनोज मिश्रा, सुनिल शिंदे, एच.एम.पटेल आदिंनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याची माहिती दिली.
-------
Post a Comment