राष्ट्रीय समाज पक्षाचे ओबीसी आरक्षण आंदोलन यशस्वी अहमदनगर (प्रतिनिधी). राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यभर मोठ्या ताकदीने राबविण्यात आले. सर्वच पक्षानी हे आंदोलन केले होते परंतु रासपाने पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आगोदर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात हे आंदोलन केले, त्याचा परीणाम म्हणजे मविआ सरकारने ओबीसी आरक्षण कायम राहण्यासाठी आवश्यक ठराव दोन्ही सभागृहात मंजूर करून केंद्रात पाठवला आहे. त्याच वेळी 5 जिल्ह्यातील जि.प.प.स.निवडणुका जाहीर झाल्या होत्या,त्यां होऊ नयेत म्हणून सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगा बरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. यावर 3 दिवस चर्चा झाल्या नंतर अखेर आज या निवडणुका रद्द झाल्या आहेत.
त्या बद्दल सर्व ओबीसी आरक्षण आंदोलनाचा भाग बनलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे अभिनंदन.
आता फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.
हे ओबीसी आरक्षण कायम होणे.
2021 ची जनगणना करताना ओबीसीचा काॅलम हा असलाच पाहिजे, ओबीसी अंतर्गत जातीसह जनगणना झालीच पाहिजे या साठी संपुर्ण भारतभर हे आंदोलन उभे करावे लागणार आहे, यात सर्वात मोठी जबाबदारी राष्ट्रीय समाज पक्षावर असणार आहे, पुढील लढ्यासाठी सज्ज व्हा.
Post a Comment