सोशल मीडिया च्या माध्यमातून होणाऱ्या हनी ट्रॅप पासून सावधान- शशिकांत नजान

सोशल मीडिया च्या माध्यमातून होणाऱ्या हनी ट्रॅप पासून सावधान- शशिकांत नजान
अहमदनगर- फेसबुक, व्हाट्सअँप, इन्स्ट्राग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या हनीट्रॅप  ( सेक्सटोरेशन ) पासून  नाट्य,चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच समाजातील प्रतिष्ठित,नावलौकिक प्राप्त व्यक्ती आणि तरुण वर्गाने सावध राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा मुख्य समन्वयक .शशिकांत नजान यांनी केले आहे.
 सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी महिला मैत्री करून नंतर अश्लील मेसेज द्वारे समोरच्या व्यक्तीला भुरळ पाडून त्याच्याशी केलेल्या मेसेज आणि अश्लील व्हिडीओ संवादाचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी करीत असून बदनामीच्या भीती पोटी बळी पडून अनेकांनी हजारो रुपये दिले आहे. सदर प्रकार हा सेक्सटोरेशनचा असून कोणीही अनोळखी महिलेशी मैत्री करताना सावधान राहावे असेही नजान यांनी संगितले.अनेकांना उत्सुकतेपोटी या प्रकारचा चांगलाच मनस्ताप झाला असून काही तरुण आत्महत्या करावी या विचारपर्यंत देखील गेले आहेत त्यांना वेळीच परिवाराने आणि मित्रांनी धीर दिल्यामुळे अनर्थ टळले आहेत. जे कोणी सेक्सटोरेशन ला बळी पडले आहेत त्यांनी न घाबरता सायबर पोलीस ठाण्यात संबधितांविरोधात तक्रार दाखल करावी.
    अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नये,आपली वैयक्तिक माहिती,फोटो शेअर करू नयेत,आलेल्या व्हिडीओ कॉल वर समोरची व्यक्ती सांगेल तसे कृत्य करू नये ही सावधानता बाळगावी आणि त्वरित सायबर पोलीस यांचेशी संपर्क साधावा.अशाच प्रकारचा कॉल आल्यामुळे वेळीच सावध होऊन आपण सायबर पोलीस यांचेकडे तक्रार दाखल केली असे शशिकांत नजान यांनी सांगितले.
     अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील कोणी या सेक्सटोरेशन मुळे संकटात आले असतील त्यांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रार देण्यासाठी पुढे यावे त्यांना कायदेशीर मदत करण्याची तयारी  ॲडव्होकेट श्री.शिवाजी आण्णा कराळे,श्री. हरजीतसिंह वधवा
,श्री.श्रेणीक शिंगवी,सामाजिक कार्यकर्ते श्री.संदीप भांबरकर,श्री.अनंत रिसे,श्री.विराज मुनोत,श्री.प्रशांत जठार यांनी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post