कोरोना नियमलीचे उल्लंघन करून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा आयुक्त श्री.शंकर गोरे यांचे दक्षता पथकांना सूचना
अहमदनगर दिनांक- निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोना संकट अजून गेलेले नाही शहरात बाजरापेठा,भाजी बाजार,खाजगी आस्थापना,सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी आढळली,कोरोना नियमावलीचे उल्लंघन होताना दिसले तर कडक कारवाई करा अशी सूचना अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथकांना आयुक्त श्री.शंकर गोरे यांनी दिल्या. प्रभाग समिती निहाय ४ आणि संपूर्ण शहरासाठी २ विशेष पथकांची नियुक्ती करून बैठक घेतली यावेळी दक्षता पथक क्रमांक १ ते ६ प्रमुख
सहाय्यक आयुक्त श्री दिनेश सिणारे,श्री.परिमल निकम,श्री.शशिकांत नजान,श्री.नानासाहेब गोसावी,श्री.जितेंद्र सारसर,श्री.राकेश कोतकर सहाय्यक श्री.सूर्यभान देवघडे,श्री.नंदकुमार नेमाणे, श्री.राहुल साबळे,श्री.किशोर जाधव,श्री.भास्कर आकुबत्तीन,श्री.अमोल लहारे,श्री.राजेश आंनद,श्री.अनिल आढाव,श्री.एस.टी. वैराळ,श्री.बाळासाहेब पवार,श्री.आर.एस. सोनावणे,श्री.रिजवान ए. शेख उपस्थित होते.
अहमदनगर शहरात कोरोना विषाणू ( कोवीड १९ ) प्रादुर्भाव रोखण्या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कामी दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात आली असून उपायुक्त श्री.यशवंत डांगे पथकाचे नियंत्रण अधिकारी आहेत.
यापूर्वी प्रभाग समिती निहाय चार दक्षता पथके होती यात वाढ करून संपूर्ण शहरासाठी दोन पथके तयार केली असून श्री.शशिकांत नजान आणि श्री.जितेंद्र सारसर या पथकाचे प्रमुख आहेत. आता एकूण सहा पथके शहर आणि उपनगर भागात कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करणार आहेत. तरी नागरिकांना नियम पाळून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त श्री.शंकर गोरे ,उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी केले आहे.
Post a Comment