.महानगरपालिका कोरोना दक्षता पथक मास्क न वापरणाऱ्यांवर करत आहे कारवाई दोन दिवसात विनामास्क ७४ नागरिकांवर १४८०० रु दंडात्मक कारवाई
byलोकअंकुर-0
सावधान..मनपा कोरोना दक्षता पथक मास्क न वापरणाऱ्यांवर करत आहे कारवाई
दोन दिवसात विनामास्क ७४ नागरिकांवर १४८०० रु दंडात्मक कारवाई
अहमदनगर,दि.२१जून,(प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसात महापालिका दक्षता पथक क्रमांक १ ते ४ आणि शहर विभाग पथक यांच्या समवेत विना मास्क फिरणाऱ्यां नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नगर शहरात कोरोना रुग्णांची आकडेवारी जरी कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा संभावित धोका टाळण्यासाठी मनपाच्या दक्षता पथकाने बेजबाबदार नागिरकांवर कारवाई करून रु.१४८०० दंड वसूल केला आहे.
या पथकाने शहरातील बालिकाश्रम रोड, बिगबाजार, सावेडी परिसरातील दुचाकी शोरूम, रेल्वे स्टेशन तसेच दक्षता पथक क्रमांक १ ते ४ यांचे समवेत चितळे रोड, लोढा हाईट्स इमारत, तेलीखुंट, दाळमंडई, कापड बाजार, गंज बाजार, सावेडी परिसर, गुलमोहोर रोड, पाईपलाईन रोड, एकविरा चौक,श्रीराम चौक येथील खाजगी आस्थापना, बँक, दुचाकी शोरूम इ. ठिकाणी संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी पथक प्रमुख राकेश कोतकर, शशिकांत नजान, सहाय्यक नंदकुमार नेमाणे, सूर्यभान, राहुल साबळे, राजेश आनंद देवघडे, अमोल लहारे, अनिल आढाव, भास्कर आकुबत्तीन, रवींद्र सोनावणे, रिजवान शेख उपस्थित होते.
मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या नियंत्रणाखाली सहा पथकांची नियुक्ती केली आहे. सहाय्यक आयुक्त दिनेश सिणारे, यंत्र अभियंता परिमल निकम, प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर (शहर विभाग), शशिकांत नजान (शहर विभाग) सांख्यिकी अधिकारी राकेश कोतकर हे पथक प्रमुख आहेत.
Post a Comment