शहर भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना व डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन


 शहर भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना व डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

        नगर - शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त तसेच जनसंघाचे प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात आयोजित बैठकीत दोघांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, कार्यक्रमाचे संयोजक सचिन पारखी, मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, सभागृहनेते रविंद्र बारस्कर, नरेंद्र कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्षा सुरेखा विद्ये, महिला अध्यक्ष अंजली वल्लाकट्टी आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   यावेळी वसंत लोढा म्हणाले, डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याने भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटली आहे. त्यामुळे त्यांचे नाव घेतल्यावरही उत्साह संचारतो. त्यांनी पाहिलेले भारत व काश्मिर एक असल्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुर्ण करत आहेत. 370 वे कलम रद्द करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळी केलेली मागणी पूर्ण केली आहे.यावेळी अभय आगरकर म्हणाले, खर्‍या अर्थाने राष्ट्राची काळजी असणारा द्रष्टनेता म्हणून डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी यांच्याकडे पाहिले जाते. भारतीय जनता पार्टीने त्यांचे बलिदान व्यर्थ जावू न देता त्यांच्या विचारावर काम केल्याने आज जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. त्यांनी रचलेल्या पायावरच भाजपाचे यशाचे शिखर उभे आहे.  भैय्या गंधे म्हणाले, डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी यांनी दिलेल्या विचारांवर व त्यांनी दाखविलेल्या मार्गावरच पावलावर पाऊल टाकून भाजपाच्या कार्यकत्यांचे काम चालू आहे. देशासाठी व पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान आम्हाला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. 6 जुलै रोजी डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी यांची जयंती आहे. त्यांचे बलिदान दिन ते जयंती पर्यंत शहर भाजपाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी  प्रास्तविकात अ‍ॅड.विवेक नाईक यांनी श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, मरावे पर किर्तीरुपे उरावे’ याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पारखी यांनी केले तर आभार तुषार पोटे यांनी मानले. यावेळी डॉ.विलास मढीकर, जगन्नाथ निंबाळकर, प्रशांत मुथा, शिवाजी दहिहंडे, जालिंदर तनपुरे, लक्ष्मीकांत तिवारी, अविनाश साखला, संतोष गांधी, ज्ञानेश्‍वर हिरडे, गोपाल वर्मा, संजय ढोणे, किशोर कटोरे आदि  उपस्थित होते.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post