अहमदनगर : संघर्ष पाचवीला पुजलेला असतांना,नियतीने घेतलेल्या परीक्षेला सामोरं जात आपल्या भाषेत आपलं विश्व चितारणारे कवी चंद्रकांत म्हस्के सर शेवंगाव च्या साहित्य चळवळीतील महत्वाचे साक्षीदार होते असे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शेवंगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवारीकर यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने प्राचार्य चंद्रकांत म्हस्के यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते,यावेळी ऑनलाईन झालेल्या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत भोसले हे होते.
प्रा.डॉ.शंकर चव्हाण यावेळी भावना व्यक्त करताना म्हणाले कि, निगर्वी असलेले म्हस्के सर स्वतः कार्यमग्न राहुन मनस्वी कविता लिहित,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी त्यांच्या कवितेतून होत असे,
प्राचार्य चंद्रकांत भोसले अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले,प्राचार्य चंद्रकांत म्हस्के हा अतिशय प्रांजळ माणुस होता,त्यांनी परिसरा पासून परिवर्तना पर्यंत कविता लिहिली, माणसांच्या जगण्याशी संदर्भ लावणारी त्यांची कविता होती,
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले,स्वागत भगवान राऊत यांनी केले, शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी राजेंद्र फंड यांनी आभार मानले,
यावेळी बापूसाहेब भोसले, प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे,अध्यक्ष राजेंद्र उदागे,सुभाष सोनवणे, बाळासाहेब शेदुरकर,प्राचार्य अशोक ढगे,दर्शन जोशी, राजेंद्र उदारे, विठ्ठल सोनवणे, प्रा.बबनराव गिरी यांनी प्राचार्य चंद्रकांत म्हस्के व कवी राम ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Post a Comment