अहमदनगर पोस्टल विभागातील सात कर्मचारी सेवानिवृत्त

अहमदनगर पोस्टल विभागातील सात कर्मचारी सेवानिवृत्त

अहमदनगर: अहमदनगर डाक विभागा मधील विविध कार्यालयातील सात कर्मचारी आज  त्याचे प्रदीर्घ सेवेतून  31मे रोजी सेवानिवृत्त झाले.
कर्जत,पारनेर,सावेडी रोड पोस्टऑफिस व अहमदनगर प्रधान डाकघर मधील तीन पोस्टमन यांचा त्यात समावेश आहे.
आज प्रधान डाकघर अहमदनगर मध्ये   जे टी भोसले साहेब प्रवर अधिक्षक डाकघर यांचे अध्यक्षतेखाली निरोप समारंभ आयोजित केला होता.
अहमदनगर प्रधान डाकघर मधील अशोक सोनवणे,  एस आर नरवडे,  डी पी देशपांडे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार  भोसलेसाहेब यांचे शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी  संदीप हदगल, संतोष यादव, महेश तामटे , निसार शेख,विजय चाबुकस्वार यांनी आपले मनोगत व्यक्त करून त्याना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पोस्टल कर्मचारी उपस्थित होते.
..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post