अशा हॉस्पिटल ला मनसे दणका देणार

कोरोना आजारावरील उपचार घेतलेल्या रूग्णांना हॉस्पिटल मध्ये भरलेली बिले महात्मा फुले जन आरोग्य योजने च्या माध्यमातून परत मिळवून देणार: नितीन भुतारे 
अहमदनगर(प्रतिनिधी)
औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना आजारांवर मोफत उपचार देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते परंतु ज्या हॉस्पिटल मध्ये हि योजना आहे त्या हॉस्पिटल ने सदर कोरोना आजारांवर उपचार घेणाऱ्या रूग्णांना या योजनेची माहिती दिली नाही व रुग्णांकडून बिले घेतली त्यामुळे हि सरळ सरळ शासनाची फसवणूक असून औरंगाबाद उच्च न्यायालयाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत त्या सर्व कोरोना रुग्णांच्या समावेश करुण रूग्णांनी भरलेली बिले पून्हा देण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतू सदर योजनेबद्दल अनेकांचा गोधळ उडालेला असल्यामुळें महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सर्व रूग्णांना याची बिले मिळवून देण्याकरिता मदत करणार असून यामध्ये उपचार घेतलेल्या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जातात आशा हॉस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रूग्णांना योजनेचा लाभ घेता येईल या मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ४२ रुग्णालयांचा सामावेश आहे. त्याची यादी नितीन भुतारे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या फेसबुक अकाऊंट वर प्रसिध्द केली जाईल. या मध्ये सदर हॉस्पिटल मध्ये ओक्सिजन लावलेल्या रूग्णांना याचा या योजनेचा लाभ घेता येईल. कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह तसेच ओक्सिजन लेवल ९४ पेक्षा उपचार घेतानी कमी होती आशा रुग्णांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संपर्क साधावा त्यांना फॉर्म भरून देण्यापासून ते त्यांचे पैसे मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठीशी उभा राहणार आहे. जिल्हाधिकारी, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या व्यवस्थापकांना अर्ज करतांना रेशन कार्ड, आधार कार्ड, तसेच रुग्णांनी भरलेली सर्व हॉस्पिटल, मेडिकल, लॅब रिपोर्ट झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडावीलागतील जे हॉस्पिटल महात्मा फुले योजनेचा अर्ज केल्यानंतर रूग्णांना परत पैसे परत देणार नाही अशा हॉस्पिटल ला मनसे दणका देणार. अशी माहिती मनसेचे नितीन भुतारे यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post