अहमदनगर : कर्जत उपविभागीय डाक निरीक्षक म्हणून अमित देशमुख यांनी नुकताच संदीप हदगल यांचे कडून पदभार स्वीकारला.
अमित देशमुख हे यापूर्वी बार्शी येथे डाक निरीक्षक पदी कार्यरत होते.
त्यांनी आजपर्यंतच्या सेवा काळात पणजी (गोवा ) व बार्शी येथे उपविभागीय डाक निरीक्षक म्हणून काम केलेले आहे.
बार्शी येथे त्यांच्या कार्यकाळात पोस्टाच्या अनेक चांगल्या योजना लोकप्रिय करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
एक लोकप्रिय डाक निरीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.
श्री देशमुख हे आळसुंदे ता. कर्जत येथील रहिवासी असून त्यांना मागील दोन वर्षापूर्वी "आळसुंदे भूषण" या पुरस्काराने ग्रामस्थांच्या वतीने गौरवित करण्यात आले आहे.
त्यांचे कर्जत येथील बदली निमित्त नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगरच्या वतीने त्याचा यथोचित गौरव अहमदनगर विभागाचे उपाध्यक्ष रावसाहेब चौधरी, ग्रामीण डाक सेवक संघटनेचे नेते अशोक बंडगर यांनी केला.
संघटनेचे जेष्ठ नेते संतोष यादव ,विभागीय सचिव संदीप कोकाटे यांनीही श्री देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी वसंतराव तोरडमल ,
दिलीप खरात, नरेंद्र राठोड, कैलास भूजबळ, दशरथ अनारसे, सुनील धस, ग्रामीण डाक सेवक संघटनेचे जेष्ठ नेते चंद्र्कांत नेटके, सुभाष अनारसे, सूरज तोरडमल हे उपस्थित होते.
---------------------------------------
Post a Comment