राहुरी : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य चंद्रकांत भोसले ३१ मे २०२१ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याकडे अहमदनगर येथील शासकीय तांत्रिक विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालयाचा अतिरिक्त कार्यभार होता.
प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी शेवंगाव, पारनेर, नगर, धुळे, नंदुरबार,राहुरी येथे सेवा केली असुन अनेक विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारा साठी मार्गदर्शन केले आहे.
प्लॅस्टिक उत्पादन बाबतीत अनेकांना मार्गदर्शन करून उद्योग उभे करून दिले आहेत.
ते जेष्ठ साहित्यिक असुन त्यांच्या “मृत्यूदंड” आणि “दोन बाल एकांकिका” या वाड्मय ग्रंथास महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट वाड्मय शासकीय पुरस्काराने सन २००६ आणि २००७ साली दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अनेक काव्य संमेलनामध्ये ते सहभागी झालेले असुन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे ते माजी अध्यक्ष आहेत. फुले, शाहू,आंबेडकरी विचारांच्या संस्था, संघटनाच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
वाचकपीठ या वाचन चळवळीची सुरुवात त्यांनी केलेली असुन विविध काव्यसंग्रहावर आत्तापर्यंत चर्चा त्यांनी घडवून आणल्या आहेत.
“न लिहिलेली पत्रे” या फेसबुक पेजवरील त्यांनी लिहिलेली “भावशाची आजीला पत्रे” ही दोन वर्षे चाललेली पत्र मालिका देशपरदेशातील वाचकांना प्रचंड आवडली. आजही या पत्रावर चर्चा होत असते.
त्यांच्या साहित्यिक आणि सेवेतील मित्रांनी मिळून सोमवारी ऑनलाईन सेवानिवृत्ती समारंभ आयोजित केलेला आहे.या ऑन लाईन समारंभात सहभागी व्हावे असे आवाहन शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संयोजक प्रा.दादा ननवरे यांनी केले आहे.
Post a Comment