मतभेद गाडून धनगर सारा एक होवूया पुण्यश्लोक अहिल्यादेवींची २ ९ ७ वी जयंती आरक्षणाची लढाई चालू करूया : माजी जेष्ठ मंत्री, अण्णासाहेब डांगे

मतभेद गाडून धनगर सारा एक होवूया  पुण्यश्लोक अहिल्यादेवींची २ ९ ७ वी जयंती आरक्षणाची लढाई चालू करूया : माजी जेष्ठ मंत्री, अण्णासाहेब डांगे
चौंडी(विशेष प्रतिनिधी)सन १ ९ ५६ साली समाजातील मागास जाती जमातींना तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांनी आरक्षण चालु केले. मात्र धनगर - धनगड हा  फरक पुढे करूण धनगर समाजाचे घटनेने देवू केलेले आरक्षण रोखले गेले . ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला ते कुठल्या कुठे जावून पोहोचले . मात्र धनगर समाजाचे आरक्षण नाकारल्यामुळे धनगर समाज विकासापासुन वंच्छित राहिला आहे असे मत महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . आण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले आहे .

मा . न्यायमुती चलिया आयोगाने धनगर व धनगड हे दोन्ही शब्द एकार्थी असल्याचे मान्य केले असून हा फरक भाषा शास्त्रामुळे दिसतोय असे म्हणून भारताच्या घटना तज्ञ ( रजिस्ट्रार ऑफ इंडिया ) कडे तशी शिफारस केली . त्यांनी ही हे मत मान्य केले असुन आपल्या वार्षीक अहवालामध्ये परिशिष्ठ दोन मध्ये ही तसे नमुद केले आहे . असे असुनही बारा - तेरा वर्षे उलटून गेली तरी केंद्र व राज्यशासन निर्णय घेत नाहीत . याचा समाज धुरीनांनी गांभीर्याने विचार करूण आपसातील मतभेद बाजूला ठेवून आरक्षणाच्या लढ्याला सिद्ध होवूया . 

ज्यांना घटनेने आरक्षण दिलेले नाही . ते एकीच्या जोरावर आरक्षण पदरात पाडून घेत आहेत . सर्व राजकिय पक्ष त्यांच्यापुढे लोटांगण घेत आहेत . धनगर समाजाने नुसत्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करित बसण्यापेक्षा समाजाच्या विकासाला चालना देणारे आरक्षण. सर्वांनी एकत्र येवून लढा उभा करून मिळविले पाहिजे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post