पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९६ वा जयंती कार्यक्रम रद्द

अहिल्यादेवी होळकर यांचा २९६ वा जयंती कार्यक्रम रद्द 
    
चौंडी(वार्ताहर)
      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी ३१ मे ला त्यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र चोंडी येथे मोठ्या उत्साहाने आपण साजरी करत होतो. परंतु , कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत महाराष्ट्रात लाॅकडाऊन असल्याने यावर्षी  " श्रीक्षेत्र चोंडी ता.जामखेड जि.अहमदनगर  येथे अहिल्यादेवी होळकर यांचा २९६ वा जयंती कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. "अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नववे वंशज माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी दिली.
      कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षीही आपण श्री क्षेत्र चोंडी येथे जयंती साजरी करू शकलो नव्हतो.  तरी मी आपणा सर्व अहिल्या भक्त व श्रद्धाळूंना नम्र विनंती करतो की, सोमवार दि. ३१ मे २०२१  रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती कोरोना महामारी असल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून घरीच जयंती साजरी करावी असे आवाहन केले आहे.


.

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post