पंढरपूर पोटनिवडणूक भाजपच्या विजयाचे राम शिंदे शिलेदार
पंढरपूर(विशेष प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांच्या विजयाचे शिलेदार म्हणून भाजपचे प्रदेश उपध्यक्ष माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्यावर प्रदेश भाजप खुश झाले आहे. सुरवातीला प्रा राम शिंदे यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून धनगर समाजातील विविध संघटनांनी मागणी केली मात्र आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांच्या नावाची शिफारस केली आणि पक्ष नेतृत्वाने आवताडे यांच्या नावाची घोषणा केली. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज न होता प्रा राम शिंदे यांनी समाधान आवताडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून पूर्ण वेळ मतदारसंघात तळ ठोकून राहिले. या मतदारसंघात धनगर समाजाचे निर्णायक मतदान असल्याने प्रा राम शिंदे यांच्यावर या मतदारसंघात विशेष लक्ष द्यावे असे वरिष्ठांनी सांगितल्या नंतर प्रा राम शिंदे यांनी अक्षरशः मतदारसंघ पिंजून काढत अनेक जाहीर सभा घेतल्या होत्या. या विजयात सिंहाचा वाटा म्हणून प्रा राम शिंदे यांच्यावर प्रदेश नेतृत्व खुश आहे
Post a Comment