मनसेच्या दणक्याने पुन्हा एका कुटुंबाला न्याय

अहमदनगर (प्रतिनिधी)१४ तास बीला साठी अडकवून ठेवलेला मृतदेह नितीन भुतारे यांच्या फोन नंतर ५ मिनिटात अंत्यविधीसाठी अमरधाम मध्ये दाखल १२मे  रोजी एक आजोबांना कोरोना असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्या नंतर ताबडतोप अहमदनगर शहरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केल्यानंतर २ तासांनी त्यांचे निधन झाले. व दोन तासांचे हॉस्पिटल बील ४० हजार झाल्यावर गरीब कुटुंबाच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्यामुळे बील कमी करण्याची विनंती केली तसेच मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम मध्ये पाठवण्याची सुध्दा विनंती केली परंतु सर्व बील भरल्याशिवाय मृतदेह देणार नाही असे हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत मृतदेह सदर हॉस्पिटल ने दिला नाही. व मृतदेह देत नसल्यामुळे त्यांनी अनेकांना फोन केले परंतू कोणीही ठोस अशी मदत त्यांना केली नाही त्यानंतर त्यांना तूम्ही मनसेचे नितीन भुतारे यांच्याशी संपर्क साधा असे काहींनी सांगितल्या नंतर त्यांनी नितीन भुतारे यांना फोन लावला व सदर सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातल्या नंतर नितीन भुतारे यांनी हॉस्पिटल मध्ये फोन लावल्या नंतर बिलाच्या बाबत विचारपूस केली. हॉस्पिटल मध्ये मी येतोय असे सदर हॉस्पिटल मधील डॉक्टरांना सांगितल्या नंतर नितीन भुतारे हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या आत सदर हॉस्पिटल४०,००० रुपयांचे बील ९५०० घेऊन मृतदेह अंत्यविधी साठी अमरधाम मध्ये पाठविला. त्या नातेवाईकांनी अखेर नितीन भुतारे  यांचे आभार मानले नितीन भुतारे यांच्या सामाजिक कामाचा झंझावात असाच सूरू राहो अशी भावना जनसामान्य माणसात होत चालली आहे. त्यामुळे नितीन भुतारे गोरगरिब जनतेला आधार बनत आहे.
कुठल्याही प्रकारचे पद नसतांना आमदार ना खासदार ना कोणता लोकप्रतिनिधी नसतांना देखील नितीन भुतारे यांच्या सूरू असलेल्या सामाजिक कामाची चर्चा जिल्हयात, शहरात जोर धरत आहे. दवाखाना व बिल संदर्भात मनसेच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post