-- प्रा डॉ संतोष तागड
नेवासे जि अहमदनगर
________________________
नेवासे (विशेष प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि स्वांतत्र्य समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. सामाजिक आणि आर्थिक मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. विश्व वंदनीय बाबासाहेबांची विचारचळवळ मानवतेचा स्वीकार करते. दांभिकतेचा धिक्कार आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा स्विकार करते. निळ्या क्रांतीने जगाला प्रबोधित केले "
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची समाजशास्त्रीय मांडणी शवविच्छेदनापेक्षा भयानक व वास्तववादी होती. धर्मग्लानी, जातीव्यवस्थेची उतरंड, अस्पृश्यता, भांडवलवादी ब्राह्मणीकरण, या सारख्या बाबीवर बाबासाहेबांनी प्रकाशझोत टाकला. मनुवादी विचार गाडून पुरोगामी विचारांचा टेंभा हाती दिला. बाबासाहेबांचे वाड्मयीन मूल्ये समाजिक बांधिलकी व्यक्त करतात. त्यांची पञकारितेची नाळ शोषितांच्या हक्कासाठी होती. कामगार चळवळीला बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराने उंची मिळाली. संविधानाने जगण्याचे हक्क व आधिकार बहाल केले.महिलांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठविला.
गौतम बुध्द,संत कबीर, म फुले या ञिवेणी गुरुशीर्वादाने आपली चळवळ डॉ आंबेडकरानी 1956पर्यत चालवली. नाशिक - काळाराम सत्याग्रह, नागपूर-धर्मांतराची घोषणा, महाड-चवदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह, पुणे -जातीय निवाडा इत्यादी घटना प्रसंग हे मानवतेसाठी आणि समतेसाठी असल्याचे दिसतात. रशियन मार्क्सवाद हा फक्त कामगार आणि भांडवलशाही यांच्यातील संघर्ष मांडतो तर आंबेडकरवाद हा मानवाच्या आतर्बाह्य बदलाचा भाग बनतो.
परराष्ट्र धोरणासह विविध विद्याशाखांत ते पारंगत असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी ठरते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित व दलितांसाठी जीवनभर यातना सहन करणारे प्रज्ञासूर्य हे 'सामुहिक जबाबदारीने' कालकथीत झाले. त्यांच्या संविधानाचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करावी.लेखक-विचारवंत, पञकार,कायदेतज्ज्ञ, अशा अनेकांनी भुमिका त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या.आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ज्ञानाची संजीवनी तिथल्या जनतेला बहाल केली. 'अन्यायाची चिरा चामडी, नाहीतर हाती भरा बांगड्या 'अशी विचार बहाल करणारी नवी पिढी नंतर तयार झाली होती.अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द.ना गव्हाणकर , नामदेव ढसाळ,राजा ढाले, वामन कर्डक,शीतल साठे व सचिन माळी, दत्ता भगत, विठ्ठल उमप आदींची झंझावाती फौज तयार झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातून मावनमुक्तीसह स्वातंत्र्य, समता , बंधुता आदी मुलभूत तत्त्व जाणवतात. प्रज्ञासूर्य बाबासाहेब हे ' दलितांचे मुक्तिदाते 'असे संबोधून बाम्हण्यवादाने एक प्रकारे जोखड टाकून बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.यापेक्षा बाबासाहेब हे मानवमुक्तिचे दाते ठरतात. या महामानवांच्या कार्यास राजमाता पतसंस्था परिवार यांच्याकडून कोटी कोटी प्रणाम.. 🙏
(अल्पसा संवाद)
Post a Comment