अहमदनगर(प्रतिनिधी)गत एक वर्षा पासून वर्तमान पत्र व्यवसाय संकटात आहे . कौटुंबिक उदरनिर्वाह अवलंबून असणारे पत्रकार,छायाचित्रकार आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.तसेच बारा बलुतेदार नाभिक समाज दुकाने व व्यवसाय बंद असल्याने लाईट बील दुकान भाडे देऊ शकत नाही. घर चालवण्यासाठी पैसा नाही.मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी अडचणी आहेत.वडार,कोळी,नंदीवाले,डोंबारी, माकडवाले,मातंग,कैकाडी,लोहार,सुतार,कुंभार व उर्वरित बलुतेदारांची परिस्थिती हातावरील पोट व पैशाअभावी या कोरोना संकटात हलाखीची झालेली आहे.
तरी वरील सर्व घटकांचा विचार करुन प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रूपये खावटी अनुदानाला मंजुरी द्यावी व त्वरीत वितरीत करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे. पारनेर विधानसभा मतदारसंघातील वंचीत बहुजन आघाडीची उमेदवार इंजि डी आर शेंडगे यांनी केली आहे.
Post a Comment