राहुरी (प्रतिनिधी)येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास दातीर हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राहुरी येथे आज पोलीस उपअधीक्षक राहुल मदने याांना निवेदनाची प्रत देऊन भावना व्यक्त केल्या.
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे काल दुपारी समाजकंटकांनी अपहरण केले ..रात्री त्यांचा मृतदेह मिळाला या घटनेबद्दल तीव्र संताप आणि चिंता व्यक्त करून म्हटले आहे की,एका पत्रकाराचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या होते ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाच्छनास्पद आहे.दातीर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून राहुरी परिसरातील अनेक गैरकृत्य उजेडात आणली होती.लोकांच्या हक्कासाठी लढताना अनेक हितसंबंधी त्यांचे शत्रू झाले होते.दातीर यांच्या लेखणीमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत अशाच धेडांनी त्यांची हत्या घडवून आणली असावी असा अंदाज निवेदनात व्यक्त केला आहे.निवेदनाची प्रत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांनाही पाठविण्यात आली आहे.
निवेदनावर रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंदारे , प्रतिष्ठानचे विजय तमनर ,ज्ञानेश्वर बाचकर,जनार्दन दातीर,सोपान दातीर,राहुल दातीर,गोकुळ दातीर, भाऊसाहेब दातीर, दत्तात्रय खेडेकर, अनिल डोलनर, अविनाश बाचकर, आण्णासाहेब बाचकर, लहाणू गडदे, किरण तागड,शिवाजी खिलारी, संतोष नजन,विट्टल रोडे,किरण जोरी,आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
Post a Comment