पत्रकार रोहदास दातीर हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी कान्हू मोरे अखेर जेरबंद

 राहुरी (विशेष प्रतिनिधी) :पत्रकार रोहिदास दातीर खून खटल्यातील  मुख्य आरोपी कानू मोरे  याला अटक  करण्यात आली आहे.                                         राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे खूनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे  दोन दिवसांपूर्वी वर्ग करण्यात आला होता.
राहुरी येथील  पत्रकार  रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता .दोन दिवसांपूर्वी माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे ,माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर अध्यक्ष भैया गंधे,यांनी  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन  देऊन तपासाला गती देण्याची मागणी केली होती.सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील  यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास.    उपअधिक्षक  संदीप मिटके   यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post