छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर व प्रेम अनेक शतकांनंतरही कायम - दत्ता जाधव
नगर - महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमध्ये अनुकुल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन बलाढ्य साम्राज्याविरुद्ध लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. शिवाजी महाराजांनी अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. शिवाजी महाराजांना जनतेचे मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे. त्यांचा आदर्श आज अनेक शतकापासून सर्वाना मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन नंदनवन मित्र मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव यांनी केले.
टिळकरोड येथील नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, योगीराज गाडे, दिपक खैरे, संतोष गेनाप्पा, आदेश जाधव, अशोक तुपे, विशाल जाधव, ऋषी जाधव, रवी जाधव आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना दत्ता जाधव म्हणाले, शिवसेनेच्यावतीने शिवजयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. परंतु सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंधने असल्यास ती मर्यादित स्वरुपात साजरी होत आहे. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणारे स्व.अनिल राठोड यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासास उजाळा दिला. कार्यक्रमास विशाल गायकवाड, विकास सपाटे, कुणाल गवळी, गणेश औशिकर, विशाल लोळगे, सचिन गोरे, प्रविण सपाटे, गणेश जाधव, विकी हिरणवाळे आदि उपस्थित होते.
--------
माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने भव्य अश्वारुढ पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला - सुरेखा कदम
नगर - शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनी स्त्रीयांचा नेहमीच आदर केला. शत्रूच्या स्त्रीयांना मान-सन्मान करुन पाठविणारे शिवाजी महाराज त्याकाळातील आदर्श राज्यकर्ते होते. हा त्यांचा मोठेपणा त्यावेळेच्या सत्ताधिशांनीही मान्य केला. मराठी साम्राज्याचे संस्थापन उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविला, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले.
माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अश्वारुढ पुतळा उभारुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, विजय पठारे, योगिराज गाडे, दत्ता जाधव, संतोष गेनाप्पा, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, शहराध्यक्षा अरुणा गोयल आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, महाराष्ट्रांचा स्वाभिमान आणि भारतीय गणराज्याचे महानायक म्हणून ओळखल्या जाणार्या शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत मिळून अनेक वर्षे मुघलांशी लढा देऊन त्यांना धूळ चारली होती. शिवाजी महाराजांचे चरित्र आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवसेनेच्यावतीनेही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन महाराजांना अभिप्रेत असलेले कार्य करत आहे, असे सांगितले.
याप्रसंगी दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर यांनी मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी रमेश परतानी, शरद कोके, अशोक कानडे, विराज कदम, दिपाली आढाव, सोनू सैंदाणे, अप्पू बेद्रे आदि उपस्थित होते.
--------दरेवाडी येथील युवकांनी आणलेल्या शिवज्योतीचे शिवसेनेच्यावतीने स्वागत
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरु केले - दिलीप सातपुते
नगर - शौर्य, पराक्रम, शारीरिक क्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतात. सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठ आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. प्रशासन, लष्कर, आरमार, दुर्ग, व्यापार, उद्योग या क्षेत्रातच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरु केले, असे नाही तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रातही नवे पायंडे पाडले, नवे दंडक निर्माण केले आहेत. अशा थोर जाणता राजाची प्रेरणा सर्वांना मिळावी, यासाठी युवकांनी काढलेल्या शिवज्योतीचे स्वागत करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो, असे शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केेले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरेवाडी येथील युवकांनी आणलेल्या शिवज्योतीचे एस.टी.स्टॅण्ड येथील महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, ग्रा.पं.सदस्या महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, अरुणा गोयल, योगिराज गाडे, गोरख बेरड, महेंद्र बेरड, प्रशांत बेरड, आदित्य बेरड, ज्ञानेश्वर कराळे, भाऊ बेरड, बाबा करोडे, आदिनाथ साळूंके आदि उपस्थित होते.
याप्रसंगी आशा निंबाळकर म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे लहानांपासून थोरांचा आदर्श आहेत. शिवचरित्रांचे स्मरण सर्वांना व्हावे, त्यांनी चेतवलेली चेतना जागृत रहावी, यासाठी युवकांनी काढलेली ही शिवज्योत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभारची साक्ष देत आहे. युवकांनीमध्ये महाराजांविषयी असलेला आदरभाव हा कायम राहिल, असे सांगून युवकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, अरुणा गोयल आदिंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श जीवनपद्धतीचे अनेक उदाहरणे सांगितले.
-------
Post a Comment