सांगवी भुसारचे माजी सरपंच माणिकराव शिंदे यांच्यासह अनेकांनी केला रासप मध्ये प्रवेश
चांदेकसारे तालुका कोपरगाव येथे राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक ना. महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकरजी गुट्टे,मुख्यमहासचिव बाळासाहेब दोडतले यांचे सूचनेनुसार व प्रा.माणिकराव दांगडे पाटील, शरदराव बाचकर यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद बाबा शेख यांच्या फार्महाऊसवर राष्ट्रीय समाज पक्षाची कोपरगाव तालुक्याची आढावा बैठक व पदाधिकारीच्या नेमणूका करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी अध्यक्ष मा.सय्यदबाबा शेख होते अहमदनगर जिल्हा प्रभारी अध्यक्ष नानासाहेब जुंधारे,शिवाजी पवार, नानासाहेब जगताप यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
कार्यकर्तेनी जोमाने पक्ष वाढीच्या कामाला लागावे कोपरगाव तालुक्यातील राजकारणाचे समीकरण थोडयाच दिवसात बदलणार असल्याचे संकेत जिल्हा प्रभारी अध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी आपल्या मनोगतात दिले.
तर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सय्यद बाबा शेख यांनी शेतीसाठी अति महत्वाचा प्रश्न म्हणजेच सध्या सरकारने केलेल्या वीज तोडणी मोहीमेवर सवालच बाबांनी उठविला, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनाही त्यांनी आपल्या अंदाजात सल्लाही यावेळी दिला आहे, शेतकऱ्यांच्या विज प्रश्नावर तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले, पुढे बाबा म्हणाले आमच्याकडून अनुचित प्रकारही घडू शकतात यास सरकार जबाबदार राहिल , यावेळी कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसारचे मा सरपंच माणिकराव शिंदे यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगर जिल्हा उत्तर सरचिटणीस प्रभारी पदी विराजमान करण्यात आले, तर विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी प्रभारी पदी ऋषिकेश बर्डे यांची वर्णी लागली आहे.याप्रसंगी राजेंद्र मोरे, संदीप कांदळकर, आप्पासाहेब गुजर, बाळासाहेब शिंदे, शहाजी दवंगे आदी
रासप कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते,
Post a Comment