अहमदनगर(प्रतिनिधी) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले होते: म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा या मागणीकरिता रविवार दि.21 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहर जिल्ह्यातर्फे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले . याप्रसंगी शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे, उप महापौर मालन ताई ढोणे, नगरसेवक उदय कराळे ,विलास ताठे, रवींद्र बारस्कर, शुभांगी ताई साठे, सभागृह नेते मनोज दुलम, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा ,प्रदेश कार्यकारणी सदस्य भानदास बेरड, संघटन सरचिटणीस एडवोकेट विवेक नाईक ,सरचिटणीस तुषार पोटे ,महेश नामदे ,उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, शिवाजी दहीहांडे, महिला अध्यक्षा अंजलीताई वल्लाकट्टी, वंदना पंडित,सविता कोटा ,प्रिया जानवे, स्वाती पळवे, मण्डल अध्यक्ष वसंत राठोड, सतीश शिंदे, अजय चितळे, संजय धोपावकर, व्यंकटेश बोमादंडी, ज्ञानेश्वर काळे ,अमित गटणे, बाळासाहेब गायकवाड ,गोरख शिंदे, प्रेम राज शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, किशोर कटोरे, सरचिटणीस आशिष आनेचा, अमोल निस्ताने, उमेश साठे,उपाध्यक्ष सिद्धेश नाकाडे, सुजित खरमाळे, अभिषेक शिंदे, किरण जाधव, राकेश भाकरे, चिटणीस अभिषेक वराळे,यश शर्मा, महिला अध्यक्ष गुनाली ताई मुथा, आकाश सोनवणे, अभिजीत सोनवणे, सुरेश शिंदे, प्रणव सरनाईक, हुझेफा शेख, ऋग्वेद गंधे यांसह पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..

Post a Comment